हृदयद्रावक! तब्बल 10 दिवस लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी बसून होती आई; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:56 AM2022-01-31T10:56:15+5:302022-01-31T10:57:23+5:30
10 दिवस आई ही आपल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासह जमिनीवर पडून राहिली होती.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हावडामध्ये रविवारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हावडामधील शिबपूर (Howrah Shibpur) भागात तब्बल 10 दिवस आई ही आपल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासह जमिनीवर पडून राहिली होती. रविवारी सकाळी या घटनेनंतर हावडा परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव श्यामली मलिक (45) असल्याचं समोर आलं आहे. तिची आई दीप्ती मलिक (60) आहे. वृद्ध महिला घरात आपल्या मुलीसह राहत होती. त्य़ा दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. घराजवळ त्यांचे नातेवाईक आहेत. मात्र कोणीच त्यांची विचारपूस केली नाही. घरात प्रवेश करताना घरभर दुर्गंधी पसरली होती. तर श्यामलीचा कुजलेला मृतदेह तिच्या आईशेजारी पडून होता. आई निश्चलपणे बसून होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी दिला.
वृद्ध महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती एका खासगी कंपनीत काम करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर तिची काळजी करणारं कोणीच नाही. श्यामली देवीचा पुतण्या शुभदीप कधी कधी घरी येत होता. तो कधी कधी जेवण घेऊन येत होता. रविवारी तो पुन्हा आला होता. मात्र दोघींवर उपचार का करण्यात आले नाही याबाबत काहीच माहिती तो देऊ शकला नाही. शुभदीपने हे मान्य केलं ही त्यांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष झालं आहे. निष्काळजीपणा झाल्याचं म्हटलं.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघींपैकी कोणीच घराबाहेर जात नव्हते. कधी कधी त्यांचे नातेवाईक घरी येत होते. तेच जेवण घेऊन येत होते. तसं पाहता श्यामली देवीजवळ जमिनीचा तुकडा आहे. तिच्या मृत्यूनंतर ती जमिन नातेवाईकांना मिळणार होती. यामुळे कदाचित त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असावं. हा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.