हृदयनाथ मंगेशकर, भूपिंदर सिंग यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौैरव
By Admin | Published: October 5, 2016 05:40 AM2016-10-05T05:40:20+5:302016-10-05T05:40:20+5:30
ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर सिंग आणि भरतनाट्यम् नर्तक सी.व्ही. चंद्रशेखर यांच्यासह कला, नृत्य, संगीत
नवी दिल्ली : ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर सिंग आणि भरतनाट्यम् नर्तक सी.व्ही. चंद्रशेखर यांच्यासह कला, नृत्य, संगीत, नाट्य क्षेत्रातील इतर मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री हिमानी शिवपुरी, सत्त्रिया नृत्यांगना शारोदी सैकिया, कव्वाल मोहंमद सईद साबरी जयपुरी यांनाही २०१५चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. चंद्रशेखर हे एकमेव फेलोशिप मिळविणारे कलाकार आहेत. सितारवादक कार्तिक कुमार, सरोदवादक ब्रिज नारायण, पंजाबी नाट्य दिग्दर्शक राणी बलबीर कौर, अभिनेता मनोज जोशी, नाट्यलेखक नंद किशोर आचार्य, दिग्दर्शक परवेज अख्तर, मुश्ताक खान, डिझायनर प्रदीप मुळ्ये आणि सरोजिनी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.