Hubli Violence: दिल्लीनंतर हुबळीमध्ये हिंसाचार, जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 12 पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 09:54 AM2022-04-18T09:54:46+5:302022-04-18T09:56:26+5:30
Hubali Mob Attack: जमावाने पोलीस स्टेशनसह रुग्णालय आणि मंदिरावरही हल्ला केला. या पार्श्वभूमीवर हुबळीमधील जमावबंदी 20 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
हुबळी: रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता कर्नाटकातील हुबळीमध्येही हिंसाचार झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुन जमावाने चक्क पोलीस ठाण्यावरच हल्ला(Mob Attack in Hubli Police Station) केला. यात 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
मंदिर आणि रुग्णालयाची तोडफोड
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे जमावाने अचानक हल्ला केला. यावेळी पोलीस ठाण्यासोबतच रुग्णालय आणि मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी हुबळी हिंसाचाराला ‘नियोजित कट’ म्हटले आहे. तसेच, कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही दिलाय.
Karnataka | Section 144 continues to remain in place in Hubballi city after a stone-pelting incident took place at Old Hubli Police Station on 17 April.
— ANI (@ANI) April 18, 2022
Till now, 88 persons including an AIMIM corporator's husband have been arrested in the matter: Hubballi Police commissioner pic.twitter.com/m5IFEWKZGx
'हा अक्षम्य गुन्हा'- मुख्यमंत्री बोमई
कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले, हा पूर्वनियोजित हल्ला होता. हुबळीमध्ये देवरा जीवनहल्ली आणि कडूगोंडहल्ली सारख्या घटना घडवून आणायच्या होत्या. हुबळीमध्ये निर्माण झालेल्या जातीय तणावावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार ते सहन करणार नाही. पोलिस कारवाई करत आहेत, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
हल्लेखोरांना सोडणार नाही- पोलीस
पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा धर्म कोणताही असो, हिंसाचारात सहभागी झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही. सुरुवातीला सुनियोजित षडयंत्र म्हणून याकडे पाहिले जात आहे. या घटनेत 12 पोलीस जखमी झाले आहेत. एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने हिंसाचार सुरू झाला. सध्या सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी पोस्ट शेअर करणाऱ्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे.