‘हुडहुड’ वादळ; लाखोंचे स्थलांतर
By admin | Published: October 12, 2014 03:05 AM2014-10-12T03:05:14+5:302014-10-12T03:05:14+5:30
‘हुडहुड’ या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्याची सर्व तयारी आंध्र व ओडिशाच्या राज्य सरकारांसह केंद्र सरकारने पूर्ण केली
Next
>हैदराबाद/भुवनेश्वर : ‘हुडहुड’ या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्याची सर्व तयारी आंध्र व ओडिशाच्या राज्य सरकारांसह केंद्र सरकारने पूर्ण केली असून, लष्कराच्या तिन्ही दलांनी आपले जवान व मदत कार्यक्रम सज्ज ठेवले आहेत. हे वादळ रविवारी दुपार्पयत विशाखापट्टणममध्ये धडकण्याची शक्यता आहे.
या तयारीचा पहिला टप्पा म्हणून आंध्र किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांतील सुमारे 1.11 लाख नागरिकांना तर ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील 3.5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आणखी सुमारे 5 लाखांहून अधिक नागरिकांना हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या 48 तासांत आंध्रच्या विशाखापट्टणम तर ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.