हुडहुड वादळ धडकले; पाच लोकांचा बळी
By admin | Published: October 13, 2014 05:36 AM2014-10-13T05:36:34+5:302014-10-13T05:36:34+5:30
हुडहुड’ चक्रीवादळ रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम्मध्ये धडकले.
Next
विशाखापट्टणम् : ‘हुडहुड’ चक्रीवादळ रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम्मध्ये धडकले. आंध्र आणि शेजारच्या ओडिशा राज्यात मिळून ‘हुडहुड’ने आतापर्यंत पाच लोकांचा बळी घेतला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे़ वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प पडली आहे़
संध्याकाळपर्यंत वादळाची दिशा बदलल्याने त्याची तीव्रता कमी झाली. ताशी १७०-१८० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे विशाखापट्टणम्, विजयनगर आणि श्रीकाकुलम येथील असंख्य झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडून गेली़ विजेचे खांब कोसळले़ तारा तुटून रस्त्यावर पडल्या़