Shimla: नरेंद्र मोदींच्या सूचनेनंतरही शिमल्यात जमली प्रचंड गर्दी ! पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:58 PM2021-07-18T12:58:27+5:302021-07-18T12:58:51+5:30
Himachal Pradesh: शिमलातील रिज परिसरात शनिवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी जमली.
नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पण, अनेक तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सतत नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आणि पर्यटनस्थळी किंवा बाजारात गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाजार आणि पर्यटनस्थळी होत असलेल्या गर्दीवर चिंता व्यक्त केली होती.
#WATCH | Himachal Pradesh: A large number of tourists was seen at Shimla's Ridge yesterday pic.twitter.com/zwvhk4d3C2
— ANI (@ANI) July 18, 2021
सरकारकडून सतत सूचना दिल्या जात असतानाही हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नुकतंच शिमलातील रिज परिसरातील काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिमलातील रिज परिसरात शनिवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, शिमलाच्या उपायुक्तांनी, "रिज आणि माल रोडमध्ये ठराविक लोकांना परवानगी असल्याचे सांगितले आहे. तसेच, गर्दी वाढल्यावर नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले जाईल, असेही ते म्हणाले."
Only a limited number of tourists & people would be allowed to enter Shimla’s Ridge & Mall Road. Only senior citizens would be allowed to sit on benches. Will request the people to get out of the crowd if there are large number of people: Deputy Commissioner Adiya Neg pic.twitter.com/N30Xyp0zBX
— ANI (@ANI) July 18, 2021
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
गेल्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिल स्टेशन, पर्यटनस्थळे आणि बाजारात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांमुळे चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, हे ठीक नाही. आपल्याला तिसरी लाट रोखायची आहे. कोरोना आपोआप जात नाही, तुम्ही बाहेर फिरुन त्याला घरी घेऊन जात आहात. जाणकारही म्हणत आहे की, गर्दीमुळे तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळा आणि गर्दी करु नका.