मानवी अस्तित्व धोक्यात? वेगाने कमी होतोय स्पर्म काउंट; अभ्यासात करण्यात आलाय मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 09:51 PM2022-11-15T21:51:55+5:302022-11-15T21:53:02+5:30

शुक्राणूंची संख्या ही केवळ प्रजनन करण्याच्या क्षमतेशीच संबंधित नाही, तर ती संख्या कमी झाल्याने शरीरावरही विपरीत परिणाम होतात. यामुळे, मोठ्या आजारांचा धोका वाढतो. तसेच, टेस्टिक्युलर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

Human existence in danger? Rapidly decreasing sperm count; A big claim has been made in the study | मानवी अस्तित्व धोक्यात? वेगाने कमी होतोय स्पर्म काउंट; अभ्यासात करण्यात आलाय मोठा दावा!

मानवी अस्तित्व धोक्यात? वेगाने कमी होतोय स्पर्म काउंट; अभ्यासात करण्यात आलाय मोठा दावा!

googlenewsNext

जगभरातील अनेक देशांमध्ये लोकांचा स्पर्म काउंट कमी होत चालला आहे. असा खळबळजनक दावा संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने केला आहे.
शुक्राणूंची संख्या ही केवळ प्रजनन करण्याच्या क्षमतेशीच संबंधित नाही, तर ती संख्या कमी झाल्याने शरीरावरही विपरीत परिणाम होतात. यामुळे, मोठ्या आजारांचा धोका वाढतो. तसेच, टेस्टिक्युलर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही, तर शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने व्यक्तीचे आयुर्मानही कमी होते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. यात एकूण 53 देशांतील आकडेवारी गोळा करण्यात आली होती. हे आकडे गोळा करण्यासाठी तब्बल सात वर्ष लागली. यात दक्षीण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश होता. यापूर्वी येथे अशा पद्धतीने स्पर्कम काउंट संदर्भात अध्यन करण्यात आलेले नव्हते. या अध्ययनात म्हणण्यात आले आहे, की पहिल्यांदाच या भागांतही लोकांमध्ये टोटल स्पर्म काउंट आणि स्पर्म कॉन्सट्रेशनमध्ये कमतरता दिसून आली. यापूर्वी असे उत्तर अमेरिका, यूरोप आणि ऑस्ट्रेलियात दिसून आले होत.

खरे तर वर्ष 2000 नंतर, संपूर्ण जगातच हे दिसून आले आहे, असेही या अध्ययनातून समोर आले आहे. हेब्र्यू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हेगाई लेव्हिन म्हणाले, भारतातून अधिक डेटा मिळाला आहे. या डेटावरून भारतातही स्पर्म काउंट मोठ्या प्रमाणावर कमीझाल्याचे दिसत आहे. ते म्हणाले, गेल्या 46 वर्षांत संपूर्ण जगात स्पर्म काउंटमध्ये 50 टक्क्यांपर्यंत कमी दिसून आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तो वेगाने कमी होऊ लागला आहे.

लेव्हिन म्हणाले, नुकत्याच झालेल्या या अध्ययनातून पुढील काळात प्रजनन क्षमतेवर अधिक परिणाम होईल, असे दिसून येते. ते म्हणाले, आजची जीवनशैली आणि वातावरणातील रसायनांचा शुक्राणूंवर वाईट परिणाम होत आहे. ही समस्या हाताळली नाही, तर माणसाचे अस्तित्वच धोक्यात येईल. भारतात लोकसंख्या कमी होत नसल्याने, येथे वेगळ्या पद्धतीने अध्ययन व्हायला हवे, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Human existence in danger? Rapidly decreasing sperm count; A big claim has been made in the study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.