CoronaVirus: माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:19 PM2021-05-18T14:19:01+5:302021-05-18T14:19:47+5:30

Humanity face in Corona Pandemic: वृद्ध महिला आणि तिचा मुलगा दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात वृद्धेचा मृत्यू झाला तर मुलाला कोरोना असल्याने त्याला येता आले नाही. यामुळे या वृद्धेवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला.

Humanity! corona positive Son in hospital, death of elderly mother; doctor did the funeral | CoronaVirus: माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus: माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

Next

Corona Teach Humanity: देशात कोरोनाच्या संकटात (Corona Pandemic) जवळचे नातेवाईक पाठ फिरवत असताना परके लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेकांच्या कुटुंबातील कर्ते, धर्ते कोरोनाने हिसकावले आहेत. अशा अडचणीच्या वेळी अनोळखी व्यक्ती मुलगा, आई-बाप, भावाचे कर्तव्य पाड पाडत आहेत. दिल्लीतील डॉक्टरने (Doctor) एका वृद्धेचा मृत्यू झाला, तिचा मुलगा कोरोनाशी झुंझत असताना तिच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. (77 year old women died due to corona, her son in Hospital; Doctor did funeral on his mother. )


वृद्ध महिला आणि तिचा मुलगा दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात वृद्धेचा मृत्यू झाला तर मुलाला कोरोना असल्याने त्याला येता आले नाही. यामुळे या वृद्धेवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. अखेर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आणि त्या वृद्धेचा मुलगा बनून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर जेव्हा तिचा मुलगा बरा झाला तेव्हा त्याच्या हाती त्याच्या आईचा अस्थिकलश सोपवून माणुसकीचे एक उदाहरण ठेवले. 


हिंदुराव  हॉस्पिटलच्या डॉ. वरुण गर्ग यांनी सांगितले की, 5 मे ची घटना आहे. रात्री 10 वाजता त्यांच्या एका सहकारी डॉक्टरचा फोन आला. सरदार वल्लभ भाई कोविड हॉस्पिटलमध्ये 77 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा मुलगाही कोरोनाबाधित आहे. तिच्या घरातील लोक हरियाणावरून येऊ शकत नाहीएत. यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत, असे सांगितले.


''हे ऐकून मला दु:ख झाले. मी लगेचच त्या मातेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय़ घेतला. माझा मित्र त्या मुलावर उपचार करत होता. त्याला सांगितले की, त्या मुलाकडून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी घे. मी स्वत: त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे.'', असे डॉ. वरुण यांनी सांगितले. 
वरुण यांच्या कुटुंबियांनीही याचे स्वागत केले. आई, पत्नी, भावाने हा देवाचाच आदेश असेल असे सांगत पाठिंबा दिला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर गेलो आणि ड्युटी संपल्यावर सायंकाळी 5 वाजता त्या मातेवर अंत्यसंस्कार केले. निगमबोध घाटावर तिचा मृतदेह पोहचविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी अस्थि घेवून मी त्याचा कलश लॉकरमध्ये ठेवला. 


मी जेव्हा काम करायचो तेव्हा मनात खूप प्रश्न उठत होते. एका मुलावर ओढवलेली लाचारी, समाजाने टाकलेला अघोषित बहिष्कार स्पष्ट दिसत होता. परंतू मला केलेल्या गोष्टीचे समाधान वाटत होते. 13 मे रोजी महिलेचा मुलगा बरा झाला. त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर मी त्याच्या हाती तो अस्थीकलश सोपविला. त्यांच्या चेहऱ्यावर अंत्यसंस्कार न करू शकल्याचे दु:ख दिसत होते. कोरोनाची लढाई सर्वांनी मिळून लढाय़ला हवी, अशी वरुण यांनी विनंती केली आहे. 

Read in English

Web Title: Humanity! corona positive Son in hospital, death of elderly mother; doctor did the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.