मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे - वरुण गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:41 AM2017-09-27T01:41:41+5:302017-09-27T01:42:07+5:30

Humanity should strive for support for Rohingya - Varun Gandhi | मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे - वरुण गांधी

मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे - वरुण गांधी

Next

- सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : म्यानमारमधून बांगला देशमार्गे भारतात शिरलेले रोहिंग्या मुस्लिमांचे जत्थे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत, ही केंद्र सरकारची अधिकृत भूमिका असताना, भाजपा खासदार वरुण गांधींनी सुरक्षेचे मूल्यांकन सरकारने जरूर करा. मात्र, मानवतेच्या भूमिकेतून असाहाय्य रोहिंग्यांना आश्रय दिलाच पाहिजे, असे म्हटल्याने भाजपामध्ये खळबळ माजली आहे.
खा. वरुण गांधींच्या दृष्टिकोनाचे जोरदार खंडन करीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, वरुण गांधींनी सरकारच्या भूमिकेच्या विरोधात असे मत व्यक्त करण्याची आवश्यकता नव्हती. देशाचे हित ज्यांना समजते, ते अशा प्रकारची निवेदने कधीही करणार नाहीत.

Web Title: Humanity should strive for support for Rohingya - Varun Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.