हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’

By admin | Published: August 31, 2014 03:13 AM2014-08-31T03:13:32+5:302014-08-31T03:13:32+5:30

काही निर्णयांवरून सरकारचा धोरणात्मक कल दिसून येतो. हा कल कॉर्पोरेट हाउसेससाठी ‘अच्छे दिन’ तर जनतेसाठी ‘बुरे दिन’ सांगणारा आहे.

This is the 'hundred bad days' of the masses | हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’

हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’

Next
मोदींच्या 100 दिवसांकडे कसे बघाल?
केवळ 100 दिवसांत कोणत्याही सरकारच्या कामगिरीचा सर्वसमावेशक आढावा घेणो कठीण आहे. पण निश्चितच या सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. काही निर्णयांवरून सरकारचा धोरणात्मक कल दिसून येतो. हा कल कॉर्पोरेट हाउसेससाठी ‘अच्छे दिन’ तर जनतेसाठी ‘बुरे दिन’ सांगणारा आहे. सरकारने सामाजिक कार्यक्रमांसाठीची तरतूद कमी केली आहे. सबसिडी कपातीमुळे लोकांवर विपरीत परिणाम होईल. दरमहा पेट्रोल-डिङोल दरवाढीचा परिणाम आपण बघतोच आहोत.
दरवाढ आणि भ्रष्टाचार हा मोदींचा प्रमुख मुद्दा होता. हे दोन मुद्दे सोडविण्यासाठी सरकारने गंभीरपणो काही केले असे वाटते काय?
मोदींना लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवाढीच्या मुद्दय़ावर बोलणो आवश्यक वाटले नाही. दरवाढीवर नियंत्रण हवे असेल तर बाजारपेठांवर अधिक नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्याऐवजी या सरकारने ‘किमान सरकार, खासगी क्षेत्रला अधिकाधिक लाभ’ हा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नच कुठे येतो.
‘लव्ह जिहाद’बद्दल काय म्हणाल?
गेले 1क्क् दिवस पाहता सार्वजनिक चर्चा विकासाची होती पण तळागाळात विनाशाचे काम सुरू होते. जातीय हिंसाचाराच्या घटना पुढील 1क् वर्षे रोखल्या जातील, असे मोदींनी म्हटले असले तरी जातीयवादाच्या मोहिमेला कुठेही स्थगिती नाही. रा.स्व. संघ आणि परिवाराच्या कारवाया सुरूच आहेत. आता तर ते युवक-युवतींच्या संमत संबंधांनाही जातीय वळण देत आहेत.
सत्तेवर येऊन 1क्क् दिवस होण्याआधीच विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला हादरे बसले आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
 त्याबद्दल कोणताही निष्कर्ष काढणो घाईचे ठरेल. भाजपाने विजयाचा केलेला गवगवा पाहता वस्तुस्थिती निश्चितच वेगळी आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे हे भाजपाला अजून शिकता आले नाही.
तथाकथित जातीयवादी भाजपाविरुद्ध लढण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते काय?
लोकांची एकजूट व्हावी, असे आम्हाला वाटते. विविध घटकांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरुद्ध एकत्र यावे. राजकीय पक्षांनी एकजूट केली तरी त्यात परस्पर सामंजस्य नसल्यामुळे कटिबद्धतेचा अभाव दिसून येतो. एकीकडे जायीयवादाशी तडजोड करायची आणि दुसरीकडे जातीयवादाविरुद्ध लढण्याची भाषा करायची असे चालत नाही. देशभरात ऐक्य समित्या स्थापन करण्यावर मुख्य भर दिला जावा. त्यामुळे हा मुद्दा समोर आणता येईल. अशा समित्यांचा भाग बनू इच्छिणारे लोक पुढे येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. जातीयवाद आणि लोकांमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणाशी लढायचे झाल्यास अशा ऐक्य समित्या तळागाळातून सुरू होण्याची गरज आहे.
त्यासाठी काय कराल?
विविध राज्यांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. आम्ही बाहेर पडलो आहोत. दोनच दिवसांपूर्वी रांची येथे मोठे संमेलन भरविले. झारखंडमध्ये निवडणुका असल्याने संघ परिवारातील संघटनांनी विविध जाती व मुस्लिमांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
 
धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट होत ‘जातीयवादी’ 
भाजपाशी लढण्याची वेळ आली असल्याचे सांगत 
माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींची पुन्हा आघाडी उभारण्याची गरज अधोरेखित 
केली. पण यात काँग्रेसला स्थान नसेल. माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्य ज्येष्ठ नेत्या वृंदा करात  यांनी 
काँग्रेससोबत केलेल्या एकजुटीत कटिबद्धतेचा अभाव राहील, असे सांगत ही शक्यता साफ फेटाळली. त्यांनी लोकमतचे फराज अहमद  यांच्याशी केलेली बातचीत..
 

 

Web Title: This is the 'hundred bad days' of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.