एक रुपयाच्या नोटेने केली तब्बल शंभर वर्षे पूर्ण, निळा रंग कायम, पण तब्बल २८ वेळा बदलले आपले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:51 AM2017-12-01T01:51:46+5:302017-12-01T01:51:58+5:30

भारताच्या कागदी चलनात एक रुपयाची नोट येऊन आज, गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या शंभर वर्षांत या नोटेचे डिझाइन २८ वेळा बदलले. परंतु तिचा निळा रंग मात्र कायम राहिला आहे.

 A hundred rupees done a hundred years of complete, blue color forever, but changed to 28 times in your form | एक रुपयाच्या नोटेने केली तब्बल शंभर वर्षे पूर्ण, निळा रंग कायम, पण तब्बल २८ वेळा बदलले आपले रूप

एक रुपयाच्या नोटेने केली तब्बल शंभर वर्षे पूर्ण, निळा रंग कायम, पण तब्बल २८ वेळा बदलले आपले रूप

Next

मुंबई : भारताच्या कागदी चलनात एक रुपयाची नोट येऊन आज, गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या शंभर वर्षांत या नोटेचे डिझाइन २८ वेळा बदलले. परंतु तिचा निळा रंग मात्र कायम राहिला आहे.
देशात एक रुपयाच्या किती नोटा आहेत याची नोंद रिझर्व्ह बँकेच्या ‘नोट््स इन सर्क्युलेशन’ अहवालात नाही. ही नोट रिझर्व्ह बँकेतर्फे नव्हे तर भारत सरकारतर्फे जारी केली जाते.
हल्ली एक रुपयाची नोट व्यवहारांत अभावानेच वापरली जाते.मात्र पूजा व धार्मिक विधीच्या वेळी दान-दक्षिणा देताना किंवा कोणत्याही शुभ व्यवहारासाठी बयाणा देताना ११, २१, ५१, असे आकडे पवित्र मानले जातात.
भारत सरकारने या नोटेची छपाई सन १९९५ मध्ये बंद केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरून २० वर्षांनी सन २०१५ मध्ये एक रुपयांच्या नव्या नोटा पुन्हा छापल्या गेल्या.
एक रुपयाची नोट चलनात येण्यापूर्वी शुद्ध चांदीचे एक रुपयाचे नाणे चलनात होते. परंतु नंतर चांदीची किंमत वाढली व लोकांनी ही नाणी चलन म्हणून वापरण्याऐवजी चांदी म्हणून वितळवून पैसे करायला सुरुवात केली. याला आळा घालण्यासाठी एक रुपयाची कागदी नोट आणली गेली.
त्या नोटा एवढ्या लोकप्रिय झाल्या की त्या वेळी आखातातील अनेक देशांत त्या नोटा चालत असत. पोर्तुगीज आणि फ्रेंच या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी स्पर्धकांनीही लगेच आपापल्या वसाहतींमध्ये एक रुपयाच्या नोटा चलनात आणल्या. सर्वप्रथम चलनात आलेली ही एक रुपयाची नोट सध्या निवडक संग्रहकांकडे आहे. प्राचिन, मुघलाई, ब्रिटिश काळातील वस्तूंचे संग्रह करणारे रमेश वेळुंदे यांना ही नोट त्यांच्या एका मित्राकडून मिळाली. त्या मित्राला ही नोट त्याच्या आजोबांकडून मिळाली होती, हे विशेष.

अशी होती पहिली नोट

भारतात कागदी चलन सन १८६१ मध्ये सुरू झाले. पण ब्रिटिश सरकारने एक रुपयाची पहिली नोट चलनात आणली ती ३० नोव्हेंबर १९१७ रोजी. तिच्यावर तेव्हाचे ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांची छबी होती व तिच्यावर ‘ही नोट ज्याच्याजवळ असेल त्याला एक रुपयाची रक्कम चुकती केली जाईल’, असे अभिवचन होते.
कोणताही समारंभ नाही : एक रुपयाच्या नोटेच्या शंभरीनिमित्त सरकारी समारंभ झाला नाही. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गुरुवारी सुरू झालेल्या ‘नॅशनल फिलॅटेलिक एक्झिबिशन’ने याची दखल घेतली. ‘मिंटेजवर्ल्ड.कॉम’ या नाणी आणि नोटांच्या आॅनलाइन प्रदर्शनातर्फे येणाºयांना पहिल्या नोटेचे चित्र छापलेले कार्ड स्मरणिका म्हणून देण्यात आले. एक रुपयाची नोट रिझर्व्ह बँकेकडून जारी होत नसल्यानेच बँकेचा त्यात सहभाग नव्हता.
 

Web Title:  A hundred rupees done a hundred years of complete, blue color forever, but changed to 28 times in your form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत