मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

By Admin | Published: August 31, 2014 03:16 AM2014-08-31T03:16:38+5:302014-08-31T03:16:38+5:30

जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते.

Hundreds of empty promises of Modi government! | मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

googlenewsNext
जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते. ही बाब रालोआचा 100 दिवसांचा कारभार पाहिल्यानंतर आता मतदारांच्या पूर्ण लक्षात आली आहे. या 1क्क् दिवसांत लोकांच्या पदरात निव्वळ कृतिशून्य घोषणांखेरीज काहीही पडलेले नाही आणि जी काही थोडीफार कृती केली गेली, ती केवळ सत्तेसाठी भुकेलेल्या भाजपा आणि रा.स्व. संघाच्या लोकांसाठी!   मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कारभारबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी  यांची परखड प्रतिक्रिया..
 
गेल्या 100 दिवसांत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू कमालीच्या महाग झाल्या आहेत. माध्यमांमधून याची चर्चा होत नाही, ही बाब अलाहिदा. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखकर तर राहोच, पण सुकर होईल असे काहीही झालेले नाही. ना  अन्नधान्याच्या किमती खाली आल्या, ना भाजीपाला स्वस्त झाला. 
सत्तेच्या पहिल्या 1क्क् दिवसांतच या सरकारने आपला अर्थसंकल्प देशाला सादर केला. पण त्याने जनतेची घोर निराशा केली. ज्याला आपण रालोआ सरकारची नीती वा उपलब्धी म्हणू शकू, असे काही अर्थमंत्र्यांनी देशाला सांगितले नाही. नाही म्हणायला या सरकारने एका आघाडीवर मात्र खरोखरीच काही कामगिरी करून दाखविली आहे आणि ती म्हणजे समाजाचे धर्माधारित आणि जातीधारित ध्रुवीकरण. 
या कार्यात भाजपा, रा. स्व. संघ, विहिंप आणि इतकेच कशाला सरकारमधील काही मंत्र्यांचाही पुढाकार आहे. वादग्रस्त प्रश्न पुन्हा पुन्हा उकरून काढून ही मंडळी समाजाचे विघटन करीत आहेत. याची सुरुवात पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांनी सत्ताग्रहणानंतर लगेच घटनेतील 37क्वे कलम रद्द करण्याचे सूचित करून केली. त्यानंतर खुद्द सरकारनेच समान नागरी कायदा आणण्याचे संकेत दिले. 
विश्व हिंदू परिषदेने लगोलग या देशात अल्पसंख्याकांना राहायचे असेल तर 
दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणूनच राहावे लागेल, असे जाहीर करून टाकले आणि शिवसेनेच्या खासदारांनी तर रमजानच्या महिन्यात एका मुस्लीम तरुणावर सक्ती करून त्याला त्याचा रोजा तोडण्यास भाग पाडले; आणि सरतेशेवटी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि सारे भारतीय 
हिंदूच आहेत,’ असे अत्यंत खळबळजनक विधान केले. 
या सर्व उदाहरणांवरून एक स्पष्ट होते की, सत्ताधारी पक्ष व त्यांचे सहप्रवासी या देशाला चमत्कारिक ध्रुवीकरणाच्या दिशेने नेऊ पाहात आहेत. साहजिकच समतोल विचार करणा:या आणि सर्वसमावेशकता जपू पाहणा:या सर्व लोकांनी या जातीयवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा धोका वेळीच ओळखून त्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. गेल्या 1क्क् दिवसांच्या या सरकारच्या कामगिरीचा विचार करायचा झाला, तर या सरकारने बहुसंख्य तसेच अल्पसंख्य अशा दोहोंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून ठेवली आहे. 
 
गेल्या 1क्क् दिवसांच्या या सरकारच्या कामगिरीचा विचार करायचा झाला, तर या सरकारने बहुसंख्य तसेच अल्पसंख्य अशा दोहोंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून ठेवली आहे. केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखविली. 

 

Web Title: Hundreds of empty promises of Modi government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.