शेकडो भारतीयांची सौदीमध्ये उपासमार

By admin | Published: July 31, 2016 04:36 AM2016-07-31T04:36:09+5:302016-07-31T04:36:09+5:30

८०० भारतीय कामगारांची सौदी अरबस्तानातील जेद्दा शहरात तीन दिवस उपासमार सुरू

Hundreds of Indians hunger in Saudi | शेकडो भारतीयांची सौदीमध्ये उपासमार

शेकडो भारतीयांची सौदीमध्ये उपासमार

Next


नवी दिल्ली : मालकाने तडकाफडकी कामावरून काढून टाकलेल्या ८०० भारतीय कामगारांची सौदी अरबस्तानातील जेद्दा शहरात तीन दिवस उपासमार सुरू असून, सौदीमधील भारतीय वकिलात तातडीने त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करीत आहे, तसेच या कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग व एम. जे. अकबर तेथे जात आहेत.
यापैकी एका भारतीय कामगाराने टिष्ट्वटरवर संदेश टाकून लक्ष वेधल्यावर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याची तातडीने दखल घेतली व सौदीमध्ये बेराजगार झालेल्या एकाही भारतीयाची सरकार उपासमार होऊ देणार नाही, अशी यांनी
ग्वाही दिली. स्वराज यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, ‘सौदी अरबस्तान व कुवैतमध्ये मालकांनी अचानक कारखाने बंद करून कामावरून काढून टाकल्याने, मोठ्या संख्येने भारतीय कामगार अडचणीत आले आहेत. त्यांना मालकांनी पगारही दिलेले नाहीत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
>सौदी अरबस्तानात बेरोजगार झालेल्या एकाही भारतीय कामगाराची उपासमार होणार नाही, याची मी ग्वाही देते. मी स्वत: परिस्थितीवर दर तासाला लक्ष ठेवून आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या.
>कुवैतमधील स्थिती
जरा बरी आहे, पण सौदीमधील परिस्थिती खूपच वाईट आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, ‘अडचणीत असलेल्या या भारतीय कामगारांच्या जेवणा-खाण्याची सोय करण्याचे निर्देश सौदी अरबस्तानातील भारतीय वकिलातीस या आधीच देण्यात आले आहेत.’

Web Title: Hundreds of Indians hunger in Saudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.