दीड लाखाचा गुटखा पकडला
By Admin | Published: December 5, 2015 11:50 PM2015-12-05T23:50:38+5:302015-12-05T23:50:38+5:30
जळगाव: रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या भीमसिंग मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता भरत विनायक बाविस्कर याच्याकडे एक लाख ५६ हजार ७५८ रुपये किमतीचा गुटखा पकडला. त्याच्याविरुध्द अन्न व सुरक्षा कायद्यान्वये शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज गाव: रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या भीमसिंग मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता भरत विनायक बाविस्कर याच्याकडे एक लाख ५६ हजार ७५८ रुपये किमतीचा गुटखा पकडला. त्याच्याविरुध्द अन्न व सुरक्षा कायद्यान्वये शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमसिंग मार्केटमध्ये गुटखा असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी एस.टी.गुजर यांना मिळाली होती. त्यानुसार गुजर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता भरत बाविस्कर हा रिक्षात गुटखा भरुन पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात दुसरे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनीही धाव घेतली. तेथे वाद होत असल्याचे पाहून गुटखा, रिक्षा व भरत याला शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथेच पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला.सहायक आयुक्त आर.आर.चौधरी यांनीही घटनास्थळाला भेट दिली.