चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:40 AM2023-07-20T06:40:54+5:302023-07-20T06:41:43+5:30

प्राचीन काळापासून चंद्राशी मानवाचे आगळेवेगळे नाते

hundreds of missions to the moon; Curiosity never ends... | चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

googlenewsNext

भारताचे चंद्रयान-३ नुकतेच चंद्राच्या दिशेने झेपावले आणि जगभरात इस्रोचे कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नियोजित ठिकाणी चंद्रयान-३ चे यशस्वी लॅण्डिंग झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. दरम्यान, नासाच्या अपोलो ११ मोहिमेअंतर्गत २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती ठरला. त्यानिमित्त दरवर्षी २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो.

n  पृष्ठभाग हा खडकसदृश असून, पृष्ठभागाखालील भाग हा अन्य ग्रहांसारखा आहे. काही खडक हे पृथ्वीवरील प्राचीन खडकांपेक्षाही जुने आहेत.

n पृष्ठभाग हा सर्वच ठिकाणी एकसमान नसून काही ठिकाणी जाड, तर बहुतांश भाग हा बेसाॅल्ट खडकाचा आहे. खडकांची निर्मिती ही उच्च तापमानाच्या लाव्हारसातून झाली. पाण्याचा कुठलाही अंश नाही. मंगळ ग्रहाच्या तुलनेत वातावरण लॅण्डिंगसाठी कठीण आहे.

चंद्राचे महत्त्व

अगदी प्राचीन काळापासून चंद्राशी मानवाचे आगळेवेगळे नाते आहे. भाऊबीज, कोजगरी पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, करवा चौथ, ईद आदी सणांच्यावेळी चंद्राचे विशेष महत्त्व आहे. 
पृथ्वीवरील भरती-ओहोटीचे गणितही सांभाळतो तो 
चंद्रच. एवढेच नव्हे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील हालचालींवरही
चंद्र परिणाम करत असल्याचे 
संशोधक म्हणतात. 
चंद्राबाबत अद्याप बरेच कुतूहल आहे. त्याच उद्देशाने विविध देशांच्या अवकाश संस्थांकडून चंद्राच्या मोहिमा राबविल्या जातात. 

इस्रोही मानवाला पाठविणार? 
अवकाशात मानवाला पाठविण्यासाठी इस्रोही तयारी करत आहे. ‘गगनयान - एच १’ या मोहिमेच्या माध्यमातून २०२४च्या अखेरीस मानवाला अवकाशात पाठविण्यात येणार आहे.

१४०+ आतापर्यंत चंद्रावर मोहिमा राबवण्यात आल्या. त्यापैकी नऊ मोहिमांमध्ये मानवाला चंद्रावर पाठवले होते.

चंद्रावर पाऊल ठेवलेल्या व्यक्ती

नील आर्मस्ट्राँग 
एडवीन एल्ड्रिन 
चार्ल्स कॉनरॅड 
ॲलन बीन 
ॲलन शेपर्ड 
एडगर मिशेल 
डेव्हिड स्कॉट
जेम्स इर्विन 
जॉन यंग 
चार्ल्स ड्युक 
इजेन केर्नन 
हॅरिसन स्क्मिट

 

Web Title: hundreds of missions to the moon; Curiosity never ends...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.