उत्खननात मिळाली शेकडो वर्षे जुनी अष्टधातूची श्री विष्णूची मूर्ती, भक्तांनी केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:28 PM2022-06-02T19:28:54+5:302022-06-02T19:29:23+5:30
Siwan Vishnu Statue: बिहारमधील सिवान जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे अनेक वर्षे जुनी भगवान विष्णू यांची शेकडो वर्षे जुनी मूर्ती मिळाल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. ही मूर्ती सुमारे २०० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाटणा - बिहारमधील सिवान जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे अनेक वर्षे जुनी भगवान विष्णू यांची शेकडो वर्षे जुनी मूर्ती मिळाल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. ही मूर्ती सुमारे २०० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ज्या ठिकाणी ही मू्र्ती मिळाली तिथे भगवान नारायणांची भव्य मूर्ती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे ही मूर्ती मिळाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. पूजापाठ सुरू झाला. या अष्टधातूच्या मूर्तीकडे साक्षात देवाचं रूप म्हणून पाहिलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीवान येथील नौतन येथे ही मौल्यवान अष्टधातूची मूर्ती मिळाली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी गावोगावचे लोक इथे धाव घेत आहेत. ही मूर्ती सुमारे २०० वर्षे जुनी असल्याचा दावा लोकांकडून करण्यात येत आहे. तसेच मूर्ती सापडली त्या ठिकाणी पूजा-पाठास सुरुवात झाली आहे.
नौतन येथील हथौजीगड गावातील एका शेतातमध्ये भगवान विष्णूची ही अष्टधातूची मूर्ती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील शेतातून माती काढण्यात आली होती. आज तिथे नांगरणी सुरू होती. त्याचवेळी तिथे एका महिलेला भगवान विष्णूंची मूर्ती दिसून आली. ही बाब बघता बघता ही खबर गावात वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला या महिलेने एकट्याने मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मूर्ती बाहेर काढता आली नाही. त्यानंतर तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तेव्हा कुठे ही मूर्ती बाहेर काढण्यात यश मिळाले.
बाहेर काढल्यावर ग्रामस्थांनी मूर्ती स्वच्छ केली. तेव्हा ती मूर्ती चमकू लागली. त्यानंतर गावातील भाविकांनी पूजापाठ करण्यास सुरुवात केली. आता गावात मोठे विष्णू मंदिर उभारण्याची मागणी सुरू झाली आहे. सध्यातरी एका झाडाखाली ठेवून या मूर्तीची पूजा केली जात आहे.