शेकडो सेवा महागणार
By admin | Published: June 1, 2016 04:49 AM2016-06-01T04:49:49+5:302016-06-01T04:49:49+5:30
केंद्रीय अर्थ संकल्पात मंजूर झालेला वाढीव सेवाकर व कृषी कल्याण अधिभार लागू होत असल्याने हॉटेल, टेलिफोन, विमान आणि रेल्वे प्रवास यासह अनेक सेवा बुधवार १ जूनपासून आणखी महाग होणार आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ संकल्पात मंजूर झालेला वाढीव सेवाकर व कृषी कल्याण अधिभार लागू होत असल्याने हॉटेल, टेलिफोन, विमान आणि रेल्वे प्रवास यासह अनेक सेवा बुधवार १ जूनपासून आणखी महाग होणार आहेत.
वित्तमंत्री अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या व संसदेने मंजूर केलेल्या अर्थ संकल्पात सेवाकरात (शिक्षण उपकरासह) १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के एवढी वाढ करण्यात आली. कृषी कल्याण अधिभार नावाचा ०.५ टक्के एवढा नवा अधिभारही सेवाकरावर लावला. या दोन्हींची अंमलबजावणी आता होत आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी लावलेला अधिकार आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे ज्या सेवांना सेवाकर लागू आहे, अशा सेवांवर १ जूनपासून नवा अधिभार धरून एकूण १५ टक्के कर लागू होईल. सेवाकराच्या नकारात्मक यादीत समावेश असलेल्या व पूर्णपणे वगळलेल्या ४७ सेवा वगळून सर्वच सेवांना हा वाढीव सेवाकर व अधिभार लागू होईल. या करवाढीमुळे येत्या वर्षभरात ग्राहकांवर सुमारे २०,६०० कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्धा टक्का या दराने लागू केल्या जाणाऱ्या कृषी कल्याण अधिभारातून मिळणाऱ्या सर्व रकमेचा विनियोग फक्त शेती सुधारणा व शेतकरी कल्याणाच्या कामांसाठी केला जाईल, असे वित्तमंत्र्यांनी या आधीच जाहीर केले आहे.हॉटेलमधील जेवण, मोबाइल फोन महागणार
विमान आणि रेल्वे प्रवासातही खिशाला झळ
१० लाखांवरील चारचाकी खरेदीसाठी एक टक्का अतिरिक्त कर
ज्वेलरी खरेदीवर अतिरिक्त कर लागणार नाही महागणाऱ्या सेवा
रेल्वे, विमान, बँकिंग, विमा, जाहिरात, आर्किटेक्चर, बांधकाम, क्रेडिट कार्ड, इव्हेंट मॅनेजमेंट, टूर आॅपरेटर्स यांसह इतरही अनेक सेवांचा समावेश असेल. प्रवाशांना दिलासा
रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवरून १ जूनपासून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्या जाणाऱ्या तिकिटांवर, सध्या आकारला जाणारा प्रति तिकीट ३० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही, असे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.