कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:44 AM2018-05-13T04:44:52+5:302018-05-13T04:44:52+5:30

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी शनिवारी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर झाले असून

Hungry condition in Karnataka? | कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच?

कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच?

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी शनिवारी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर झाले असून, त्यानुसार यंदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि राजकीय स्थिती अस्थिर राहील, असे दिसत आहे. विधानसभा त्रिशंकू राहील, असे सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून दिसून आल्याने काँग्रेस व भाजपाचे नेते भलतेच अस्वस्थ झाले आहेत.
राज्यात सुमारे ७0 टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेने मतदान पार पडले, एका मतदारसंघातील केवळ दोन बुथवर पुन्हा मतदान होणार आहे, असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना नाकात घालायच्या सोन्याच्या चमकी दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिवाय काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. मात्र अशा प्रकारांमुळे मतदानाला कुठेही गालबोट लागले नाही.

१५ मे रोजी मतमोजणी
या सर्व २२२ मतदारसंघांत मंगळवार, १५ मे रोजी मतमोजणी होणार असून, त्या दिवशी दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी अपेक्षा आहे. वृत्तवाहिन्यांनी निकालापर्यंत न थांबता मतदान संपल्यानंतर अवघ्या एका तासातच त्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष सांगण्यास सुरुवात केली. या चाचण्यांचे जे निष्कर्ष आले आहेत, ते पाहता विधानसभेत कोणालाही स्पष्ट वा साधे बहुमतही मिळणार नाही. काँग्रेस वा भाजपा यांना जनता दलच्या मदतीशिवाय सरकारच स्थापन करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

विश्वास ठेवायचा का?
अर्थात मतदानोत्तर चाचण्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळी या चाचण्यांचे निकाल सपशेल खोटे ठरले होते. कर्नाटकबाबतही विविध चाचण्यांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. काहींनी काँग्रेसला तर काहींनी भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. एका वृत्तवाहिनीने दोन संस्थांमार्फत चाचण्या घेतल्या. त्यापैकी एकात काँग्रेसला तर दुसऱ्या चाचणीत भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या.

एकूण ९ मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे (चौकटीत) वेगवेगळे आल्याने सर्व चाचण्यांतील आकड्यांची सरासरी काढली तर काँग्रेसला ९२, भाजपाला ९६ व जनता दलाला ३१ तर अन्य व अपक्ष यांना ३ जागा मिळतील, असे दिसते. अर्थात एका वृत्तवाहिनीने दोन चाचण्या घेतल्याने हे आकडे आले आहेत. त्या वाहिनीच्या दोन चाचण्यांमुळे दोन्ही पक्षांना झुकते माप मिळाले आहे.

वृत्तवाहिन्यांचे अंदाज
काँग्रेस भाजपा जेडीएस अन्य
न्यूज एक्स-सीएनएक्स ७२-७८ १०२-११० ३५-३९ ३-५
न्यूज १८ लोकमत ९०-१०३ ८०-९३ ३१-३९ २-४
एबीपी-सी व्होटर ८९-९९ ९७-१०९ २१-३० १-८
रिपब्लिक टीव्ही ९५-११४ ७३-८२ ३२-४३ --
सुवर्णा टीव्ही १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४
इंडिया टीव्ही १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४
टाइम्स नाऊ -व्हीएमआर ९० -१०३ ८०-९३ ३१ -३९ २-४
टाइम्स नाऊ -चाणक्य ७३ १२० २६ ०३
इंडिया टुडे १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४

Web Title: Hungry condition in Karnataka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.