हृदयद्रावक! बैलजोडी न परवडल्याने मुलींना जुंपलं औताला

By admin | Published: July 9, 2017 04:18 PM2017-07-09T16:18:37+5:302017-07-09T20:10:24+5:30

मुलींनींच नांगर ओढण्याचे काम कराव लागत असल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे.

Hurried! Girls do not suffer from bullocks | हृदयद्रावक! बैलजोडी न परवडल्याने मुलींना जुंपलं औताला

हृदयद्रावक! बैलजोडी न परवडल्याने मुलींना जुंपलं औताला

Next

ऑनलाइन लोकमत
सिहोर, दि. 9 - पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाने शेतीच्या मशागतीचं काम सुरु केलं आहे. शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने औताला मुलींना जुंपन्याची वेळ मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यावर आली आहे. सेहोर येथील वसंतपूर पांगरी गावात राहणारे सरदार काहला या शेतकऱ्याकडे पैशांचा तुटवडा आहे. बैल खरेदी करण्यासाठी व त्यांची निगा राखण्यासाठी पैसे नसल्याने त्याच्या मुलींनींच नांगर ओढण्याचे काम कराव लागत असल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे.
गरीबीमुळे बैलजोडी खरेदी करणे आणि पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेत जमिनीच्या मशागतीची कामं ते मुलींच्या साह्याने करत आहेत. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे.

आणखी वाचा - बळीराजानं औताला जुंपलं नातू आणि मुलाला

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे माझ्या दोन्ही मुली शाळा सोडून घरी बसल्या. शेतीच्या कामासाठी बैल विकत घेऊन त्यांची काळजी घेणं मला परवडत नाही. शाळेत जात नसल्यामुळे दोन्ही मुली मला शेतीच्या कामात मदत करतात" असे काहला यांनी सांगितले.
दरम्यान प्रशासन याप्रकरणात लक्ष घालत असून संबंधित शेतकऱ्याला सरकारी योजनेअंतर्गत योग्य मदत देण्यात येईल, असे माहिती जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी आशिष शर्मा यांनी सांगितले.

 

Web Title: Hurried! Girls do not suffer from bullocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.