लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-नवरीचा हार्टअटॅकनं मृत्यू; असं का घडले? तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:25 PM2023-06-05T14:25:12+5:302023-06-05T14:25:47+5:30

नवरा-नवरीच्या खोलीतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. वधू-वर मृत अवस्थेत खोलीत आढळले.

Husband and wife die of heart attack on first night of marriage; Why did this happen? Experts say... | लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-नवरीचा हार्टअटॅकनं मृत्यू; असं का घडले? तज्ज्ञ सांगतात...

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-नवरीचा हार्टअटॅकनं मृत्यू; असं का घडले? तज्ज्ञ सांगतात...

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बहराइच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद शोकसागरात विरून गेला. २२ वर्षांच्या मुलाची लग्नाची मिरवणूकीत नाचून कुटुंबातील सदस्याने २० वर्षांच्या मुलीला त्यांची सून म्हणून घरी आणले. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर एकत्र खोलीत जातात, पण सकाळी दोघांची खोली उघडत नाही. कुंडी वाजवूनही दोघांची खोली उघडत नाही, तेव्हा वराच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी मारली.

नवरा-नवरीच्या खोलीतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. वधू-वर मृत अवस्थेत खोलीत आढळले. जेव्हा त्याने पटकन कुंडी उघडली तेव्हा कुटुंबातील इतर लोक येऊन नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे शरीर थंड होते. नवरीही मृत होती. घरात कल्लोळ माजला. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले तेथे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि जे कारण समोर आले ते हैराण करणारे होते. 

या दोघांनाही एकाचवेळी हार्टअटॅक आला होता. एकाचवेळी हार्टअटॅक येऊ शकतो का? दोघांचा मृत्यू त्यामुळेच झाला का? इतक्या कमी वयात हे कसं होऊ शकते? दोघांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे राहिले. याबाबत हृदयरोग तज्ज्ञ आणि फोर्टिस हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.अजय कौल यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आकडेवारी पाहिली तर दररोज अशा बातम्या वाचायला मिळतात ज्यामध्ये लोकांना चालताना हृदयविकाराचा झटका येतो. सायलेंट हृदयविकाराचा झटका सर्व वयोगटातील लोकांना बळी बनवतोय. कोरोना हा RNA व्हायरस आहे. अशा विषाणूंमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा ब्लॉकेज होतात ज्यामुळे हृदयातील रक्त प्रवाह असामान्य होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. नवरा-नवरीचा एकाचवेळी मृत्यू ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. याला सेक्सुअल एक्टिविटीशी पूर्णत: जोडले जाऊ शकत नाही. 

सेक्सुअल एक्टिविटीदेखील कारण असू शकते?
या प्रकरणात, कौटुंबिक इतिहास प्रथम पाहिला पाहिजे. असे होऊ शकते की दोघांना आधीच हृदयाचा त्रास आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा दोन व्यक्तींनी लग्न करणे ही काही मोठी गोष्ट नाही. तणाव, परिस्थिती आणि लैंगिक क्रियाकलाप दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. एकप्रकारे, दोन व्यक्तींना एकत्र हृदयविकाराचा झटका आला तर त्याला अंधश्रद्धेशी जोडले जावे, हे गौन आहे. महामारीनंतर वाढलेल्या हृदयाच्या समस्यांशी त्याचा संबंध जोडूनच मी हे पूर्णपणे पाहू शकतो.

Web Title: Husband and wife die of heart attack on first night of marriage; Why did this happen? Experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.