हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या 5 दिवसांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 04:53 PM2023-02-20T16:53:40+5:302023-02-20T17:00:14+5:30

किशोर कुमारचं 15 फेब्रुवारीलाच सीकरमध्ये लग्न झालं होतं.

husband and wife died in road accident just after 5 days of marriage in nagaur rajasthan | हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या 5 दिवसांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

फोटो - आजतक

Next

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जायलमध्ये रविवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमध्ये असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात नववधूचा भाऊ गंभीर जखमी झाला. जायल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच जखमीला प्राथमिक उपचारानंतर नागौर येथे रेफर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जयाल येथील कल्पना चावला शाळेजवळ सीकरकडून येणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात कारमध्ये असलेले किशोर कुमार आणि त्यांची पत्नी किरण यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

किशोर कुमारचं 15 फेब्रुवारीलाच सीकरमध्ये लग्न झालं होतं. 16 फेब्रुवारी रोजी तो आपल्या वधूसह फलोदी गावात पोहोचला. यावेळी संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. यानंतर 18 फेब्रुवारीला किशोर कुमार आपली वधू किरणसोबत सासरच्या घरी पोहोचला. दुसरीकडे, 19 फेब्रुवारी रोजी पत्नी किरण आणि मेव्हणा कृष्ण कुमार यांच्यासोबत कारने गावाकडे निघाला. त्यावेळी अचानक अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात नवविवाहित जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. 

स्थानिक लोकांनी जायल पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी कृष्ण कुमारला प्राथमिक उपचारासाठी जायलच्या सीएससीमध्ये आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने या तरुणाला नागौर येथे रेफर करण्यात आले. नागौरच्या पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि रात्री दोघांचेही कुटुंबीय जायल येथे पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: husband and wife died in road accident just after 5 days of marriage in nagaur rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.