लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी रूममध्ये गेले पती-पत्नी, सकाळी बेडवर आढळले दोघांचे मृतदेह अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 04:12 PM2023-06-02T16:12:02+5:302023-06-02T16:13:23+5:30
या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
बहराइच - उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समो आली आहे. येथील प्रताप आणि पुष्पा यांचे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्रीत पती-पत्नींचा संशयास्पद मृत्यू होऊनही कुटुंब शवविच्छेदनास तयार नव्हते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर, ते शवविच्छेदनासाठी तयार झाले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आले आहेत. आता पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल.
यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानजय सिंह म्हणाले, ज्या ठिकाणी मृतदेह आढळले त्या ठिकाणी उलटीही होती. यामुळे प्राथम दृष्ट्या हे फूड पॉयझनिंगचे प्रकरण वाटते. यासंदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
रूममध्ये बेशुद्धावस्थेत पडून होते पती-पत्नी -
कैसरगंज कोतवाली भागातील गोडहिया क्रमांक चार येथील रहिवासी प्रतापचे (23) लग्न गोडहिया क्रमांक तीन गुल्लनपुरवा गावच्या पुष्पा सोबत 30 मे रोजी झाले होते. 30 मे रोजी गोडहिया क्रमांक चारमध्ये वरात गेली होती. ती 31 मे रोजी आनंदात गावात पोहोचली. रात्रीच्या सुमारास पती-पत्नी आपल्या गावी पोहोचले. रात्री उशीरा या नवदाम्पत्याने आपली रूम बंद केली. गुरुवारी सकाळी या दाम्पत्याने दरवाजा उघडलाच नाही, तर कुटुंबातील लोक गडबडले.
यानंतर, सर्वांनी रूम मद्ये पाहिले तर पुष्पा आणि प्रताप दोघेही बेशुद्धावरस्थेत पडलेले होते. या सर्वांनी काही प्रयत्न करून दरवाजा उघडला तर दोघेही मृतावस्थेत पडलेले होते. यानंतर मुलाकडील लोकांनी मुलीकडच्या लोकांना घटनेची माहिती दिली. यावर दोन्ही कुटुंब एकत्रत आले. या घटनेनंतर गावात सन्नाटा पसला आहे.