लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:51 AM2023-08-14T10:51:35+5:302023-08-14T11:00:11+5:30

नवऱ्याने आपल्या पत्नीला लाखोंचं कर्ज काढून शिकवलं. मात्र आता नर्स झाल्यावर बायकोने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.

husband appealed to collector ias dm to call his wife back she got government job | लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ"

लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ"

googlenewsNext

मध्यप्रदेशच्या अनूपपूर जिल्ह्यातील पकारिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या पत्नीला लाखोंचं कर्ज काढून शिकवलं. मात्र आता नर्स झाल्यावर बायकोने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची देखील धमकी दिला आहे. जोहान भरिया असं या व्यक्तीचं नाव असून तो आपली समस्या घेऊन अनूपपूर कलेक्टरकडे पोहोचला होता. 

पतीने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी मीनाक्षी माझ्याकडे येत नाही. लग्न झाल्यावर मी तिच्या अभ्यासावर बराच खर्च केला. आता ती मला ओळखण्यास नकार देत आहे. तिने आमच्या मुलीलाही सोबत नेलं आहे. माझ्या बायकोला माझ्याकडे परत पाठवा. मीनाक्षी आधीच विवाहित होती. मात्र, ती सासरी न जाता आई-वडिलांकडे राहायची. याच काळात माझी भेट झाली. मी कोणाला न सांगता मीनाक्षीशी लग्न केलं आणि ती माझ्यासोबत राहू लागली. लग्नानंतर आम्हाला मुलगी झाली.

नर्सचं शिक्षण घेण्यासाठी लाखोंचा खर्च केला

जोहान पुढे सांगतो की, मीनाक्षी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची. शिक्षक आणि नर्सिंगच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती. तिची शिकण्याची जिद्द पाहून मी एक लाख 15 हजार रुपयांचे कर्ज घेतले. यानंतर मीनाक्षीला जीएनएममध्ये प्रशिक्षण देण्यात आले. मी दोन वर्षे कर्जबाजारी होतो. अधिक पैशांची गरज भासली तेव्हा विमा पॉलिसी तोडली आणि ते पैसे मीनाक्षीवर खर्च केले. निवड झाल्यानंतर मीनाक्षी खांडवा जिल्हा रुग्णालयात गेली.

नवरा म्हणून स्वीकारण्यास नकार 

जोहानच्या म्हणण्यानुसार, मीनाक्षी नर्स झाल्यानंतर बदलली. तिने माझ्याकडे येणं बंद केलं आणि ती तिच्या माहेरच्या घरी राहू लागली. मी तिला माझ्या घरी पकारियाला जाण्यास सांगितले असता तिने मला तिचा नवरा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि मला ओळखण्यासही नकार दिला. तिच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलंय, तू दुसरी बायको बघ, असं ती म्हणू लागली.

मुलीला सोबत नेले, मारण्याची दिली धमकी 

जोहानने सांगितले की, तो आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन गुजरातमध्ये कामाला गेला होता. दरम्यान, मीनाक्षी तिचा भाऊ अमित आणि अन्य एका व्यक्तीसह गुजरातमध्ये त्याच्याकडे आली. येथे आल्यानंतर तिघांनीही मला जीवे मारण्याची धमकी देत ​​माझ्या मुलीला जबरदस्तीने माझ्यापासून दूर नेले. मीनाक्षीने मला सांगितले की तिने एका व्यक्तीकडून 1.5 लाख रुपये उसने घेतले होते आणि आता त्याच्यासोबत राहणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: husband appealed to collector ias dm to call his wife back she got government job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.