बाबो! 3 मुलांच्या आईने प्रियकरासोबत घेतल्या सप्तपदी; 3 महिन्यांपूर्वीच पतीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:23 AM2023-03-07T11:23:35+5:302023-03-07T11:33:40+5:30

तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

husband died 3 months ago 1 month of love and marriage all three children were involved | बाबो! 3 मुलांच्या आईने प्रियकरासोबत घेतल्या सप्तपदी; 3 महिन्यांपूर्वीच पतीचा झाला मृत्यू

फोटो - दैनिक भास्कर

googlenewsNext

पहिल्या पतीच्या निधनानंतर तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी छतरपूर येथे पालिकेने मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत आयोजित सामूहिक विवाह परिषदेत या दोघांनी लग्न केलं. लग्नात मुलाच्या बाजूने संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, परंतु वधूच्या बाजूने फक्त तिची तीन मुले उपस्थित होती. पानगर गावात राहणाऱ्या सुशीला कुशवाहाचा विवाह सर्वात अनोखा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनगुवां येथील रहिवासी अज्जू कुशवाहासोबत सुशीलाने सप्तपदी घेतल्या. सुशीलाने सांगितले की, तिच्या पतीने काही महिन्यांपूर्वी विष घेतले होते. अचानक पतीची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कौटुंबिक वाद आणि कर्जामुळे पतीने हे पाऊल उचलले. त्याने तिला आणि मुलांना एकटे सोडले. कौटुंबिक वाद आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेले कर्ज हे पतीच्या मृत्यूचे कारण ठरले. 

तीन महिन्यांपूर्वी पतीने विष घेतले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला वाचवता आले नाही. पतीच्या निधनानंतर एकाकी पडले आणि तीन मुलांची जबाबदारीही माझ्यावर आली असं महिलेने म्हटलं आहे. महिनाभरापूर्वी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या अज्जू कुशवाह ओळख झाली. दोघेही एकाच समाजाचे आहेत. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 

अज्जूचे लग्न झाले नव्हते. महिलेने तिची व्यथा सांगितली तर तो शांतपणे ऐकत असे. तो समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. अज्जूने लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता महिलेने होकार दिला. अज्जूने मुलांना त्याचे नाव देण्यास होकार दिला. कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. पण दोघं लग्न करण्यावर ठाम होते. त्यांनी अखेर लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: husband died 3 months ago 1 month of love and marriage all three children were involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न