'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 09:20 AM2020-08-21T09:20:28+5:302020-08-21T09:22:18+5:30
शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे.
संभल : उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. साधारणपणे पती मारहाण करतो, दारु पितो, पतीचे लफडे आदी अनेक कारणांवरून तलाक, घटस्फोट घेतले जातात. मात्र, संभलमधील हे प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे. एका महिलेला पतीपासून वेगळे व्हायचे आहे. लग्नाच्या 18 महिन्यांनंतर यासाठी या महिलेने शरिया न्यायालयात अर्ज केला आहे.
शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे.
शरियामध्ये अर्ज फेटाळल्यानंतर या महिलेने स्थानिक पंचायतमध्ये देखील विनंती केली. मात्र, पंचायतीनेही यावर काही निर्णय देण्यास नकार देत हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगितले.
जेव्हा या महिलेला तलाकसाठी अर्ज दिल्यानंतर बोलावण्यात आले, तेव्हा तिने पती आपल्यावर एवढे प्रेम करत आहे की आपण ते पचवू शकत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून पती माझ्यावर कधीही ओरडला नाही. नाही कोणत्या मुद्द्यावर मला त्याने निराश केले. अशा वातावरणात माझा श्वास कोंडू लागला आहे. कधीकधी तो माझ्यासाठी जेवनही बनवितो. तसेच घरातील काम करण्यासही तो मदत करतो. मी जे त्याला काही सांगते ते तो मान्य करतो. अशाने माझा श्वास कोंडू लागला आहे, असे सांगितले.
महिलेने सांगितले की, तिच्या लग्नाला 18 महिने झाले आहेत. या काळात पतीने कधीच तिच्यासोबत भांडण केले नाही. ''जेव्हाही मी कोणती चूक करते, तो मला नेहमी माफ करतो. मी त्याच्याशी वाद घालायला गेले की तो हसून माझे बोलणे ऐकतो. उलट उत्तर कधी करत नाही. मला असे आयुष्य जगायचे नाहीय. जिथे पती प्रत्येक गोष्ट मानत असेल आणि वाद घालत नसेल.'', असे या महिलेने सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव
शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर
मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले
लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले
पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब