पतीला 'जाडा हत्ती' म्हणणं ठरु शकतं घटस्फोटाचं कारण
By admin | Published: March 28, 2016 06:21 PM2016-03-28T18:21:02+5:302016-03-28T18:21:40+5:30
आपल्या पतीच्या लठ्ठपणावरुन त्याला टोमणे मारुन बोलणं, जाडा हत्ती असा उल्लेख करणं घटस्फोटाचं कारण ठरु शकतं
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 28 - आपल्या पतीच्या लठ्ठपणावरुन त्याला टोमणे मारुन बोलणं, जाडा हत्ती असा उल्लेख करणं घटस्फोटाचं कारण ठरु शकतं. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पतीला 'जाडा हत्ती' असं बोलण हे विवाह कराराचं उल्लंघन असू शकतं. 2012मध्ये कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालायाने कायम ठेवला आहे.
लठ्ठ असल्या कारणाने आपली पत्नी आपल्याला टोमणे मारते तसंच लैगिक सुख देत नसल्याची तक्रार करत पतीने न्यायालयाच घटस्फोटाची मागणी केली होती. ज्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली होती. पतीला अशा प्रकारे टोमणे मारणे हे मानसिक क्रूर कृत्य असल्याचं म्हणत न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली होती. आपला पती जरी लठ्ठ असला तरी त्याला जाडा हत्ती म्हणण हा त्याच्या स्वाभिमानावर घाला असल्याचं मत न्यायाधीस विपीन सांघी यांनी मांडलं आहे.
35 वर्षीय उद्योजकाने ही याचिका दाखल केली होती. या उद्योजकाचे वजन 100 किलो आहे. त्यावरुन माझी पत्नी माझा छळ करते तसंच लैंगिक सुख देण्यास असमर्थ असल्याची वारंवार तक्रार करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशाप्रकारे टोमणे मारणे असंवेदनशील असून मस्करी करण्याच्या किंवा काळजी असण्याच्या हेतूने मारले जाण्याची शक्यता कमी असल्याचं न्यायालयाने म्हंटलं आहे. पत्नीने हे सर्व खोटे असल्याचं म्हंटलं आहे, न्यायालयाने मात्र पत्नीचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे.