भक्ती ठरली जीवघेणी! बागेश्वर धामच्या दरबारात नेऊ शकला नाही पती; पत्नीचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:14 AM2023-04-01T10:14:43+5:302023-04-01T10:15:02+5:30
एका महिलेसाठी बागेश्वर धामची भक्ती जीवघेणी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेसाठी बागेश्वर धामची भक्ती जीवघेणी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंचनपूर परिसरात राहणाऱ्या पल्लवी चौधरी हिने गळफास लावून आत्महत्या केली. कारण तिच्या पतीने तिला धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात नेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवीला दोन लहान मुलं आहेत. पल्लवीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अधारताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंचनपूर परिसरातील आहे. संदीप चौधरी हे पत्नी पल्लवी, दोन मुले आणि आईसोबत राहत होते. वृद्ध आईला गंभीर आजार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. संदीप कसा तरी कुटुंब चालवतो. तो दोन मुलांना शिकवत आहे आणि त्याच्या आजारी आईवर उपचार करत आहे. संदीपची पत्नी पल्लवी चौधरी या दररोज बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत असत आणि घरातील अडचणी दूर करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवत असत.
27 मार्च रोजी पल्लवीने तिच्या पतीकडे पानगर येथे होणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या भागवत कथेला जावे, असा आग्रह धरला, परंतु त्याच दिवशी संदीपने तिला तिच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेले आणि डॉक्टर नसल्यामुळे उशीरा आले. दुसरीकडे, घरी प्रवचनासाठी जाण्यासाठी थांबलेल्या पल्लवीने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीपने सांगितले की, घटनेनंतर लगेचच शेजाऱ्यांसह घराचा दरवाजा तोडला आणि पल्लवीला पाहून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. एसआय अनिल कुमार यांनी सांगितले की, ही घटना बाबांवरील अंध भक्तीचे परिणाम आहे. लोक बेकारी, रोगराई आणि आर्थिक समस्यांचे समाधान बाबांच्या चमत्कारात शोधत आहेत. आता बाबांच्या चमत्काराने त्यांच्या समस्या संपतील, असे त्यांना वाटते. पल्लवीलाही बाबांच्या दरबारात जाता आले नाही, तेव्हा तिने आत्महत्या केली. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"