युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:47 IST2025-04-16T14:47:07+5:302025-04-16T14:47:20+5:30
रविनाचे सोशल मीडिया व्यसन पाहून प्रविण बऱ्याचदा तिला समजावत होता. यावरून त्यांच्यात वादही होत होता. तसेच प्रविणला रविनाचे तिचा युट्यूबर मित्र सुरेशसोबत प्रेमसंबंध असल्याचाही संशय होता.

युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
युट्यूबर पत्नीने दुसऱ्या एका युट्यूबर मित्रासोबत शरीर संबंध ठेवताना पतीने पाहिले आणि त्या युट्यूबर पत्नीने त्याचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. रविना राव असे या युट्यूबर महिलेचे नाव असून तिचे इन्स्टावर जवळपास ३४००० फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर ५०००. या घटनेच्या तीन दिवसांनी पती प्रविण याचा मृतदेह सापडला होता. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर यामागे युट्यूबर पत्नी आणि तिच्या लव्हरचा हात असल्याचे समोर आले आहे.
रविनाचे सोशल मीडिया व्यसन पाहून प्रविण बऱ्याचदा तिला समजावत होता. यावरून त्यांच्यात वादही होत होता. तसेच प्रविणला रविनाचे तिचा युट्यूबर मित्र सुरेशसोबत प्रेमसंबंध असल्याचाही संशय होता. २५ मार्च ला प्रविण घरी आला होता. तेव्हा त्याने या दोघांना शरीर संबंध ठेवताना नको त्या अवस्थेत पाहिले. यावरून प्रविणने रविनासोबत वाद सुरु केला. रविनाने तिथेच बाजुला पडलेली ओढणी घेतली आणि सुरेशच्या मदतीने त्याच्या गळा आवळला. यात प्रविणचा मृत्यू झाला.
प्रविणचा मृतदेह घरात असल्याने तीने सुरेशसोबत मिळून विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला. यासाठी त्यांनी रात्र होण्याची वाट पाहिली. मोटरसायकलवर प्रविणचा मृतदेह मध्ये ठेवून दोघेही निघाले. घरापासून सहा किमीवर प्रविणचा मृतदेह फेकून परत घरी परतले. तीन दिवसांनी प्रविणचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा एक महिला आणि पुरुष प्रविणचा मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसले होते. ही महिला रविना असल्याची ओळख पटताच पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
सुरेशने पोलिसांना सर्व माहिती दिली. रविना शुटिंगसाठी बाहेर गेली होती. ती २५ मार्चला प्रविणच्या घरी परतली होती. तेव्हा आम्ही दोघे भेटलो. यावेळी घरातच आम्ही शरीरसंबंध ठेवत होतो. ते प्रविणने पाहिले. भांडण, धक्कामुक्कीत प्रविणचा मृत्यू झाला. रविना तो दिवस काहीच घडले नाही असे वागत होती. जेव्हा रविनाला तिचे नातेवाईक प्रविण कुठेय असे विचारत होते, तेव्हा ती त्यांना आपल्याला माहित नाही असे उत्तर देत होती. मी दुपारीच निघून गेलो होतो. रात्री पुन्हा आलो आणि आम्ही दोघे प्रविणच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी गेलो, असे सुरेशने पोलिसांना सांगितले.