पतीला हृदयविकाराचा झटका, कलियुगातील 'सावित्री'च्या प्रेमापुढे मृत्यूनेही मानली हार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 10:21 AM2022-10-02T10:21:05+5:302022-10-02T10:21:47+5:30
उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे स्थानकावर पत्नी आणि रेल्वे पोलीस यांच्या समयसूचकतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. चालत्या रेल्वेमध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता.
मथुरा: मथुरा रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा पत्नी आणि रेल्वे पोलीसांमुळे जीव वाचवल्याचे समोर आले आहे. निजामुद्दीन तिरुअनंतपुरम एक्सप्रेस सुपरफास्टमध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी वेळीच पत्नीने आणि रेल्वे पोलिसांनी प्रथम उपचार केले, त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. यावेळी आरपीएफने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.
सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशीरा निजामुद्दीन तिरुअनंतपुरम एक्सप्रेस सुपरफास्टमध्ये चेन्नईतील निवासी ६७ वर्षीय केशवन आणि त्यांची पत्नी प्रवास करत होते.यावेळी चालत्या ट्रेनमध्ये अचानक त्यांची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती आरपीएफला देण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर रिंगणात; त्रिपाठींचा अर्ज बाद
यावेळी रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीला ट्रेनमधून खाली उतरवले. यावेळी आरपीएफने त्या व्यक्तीच्या पत्नीला सीपीआर देण्यास सांगितले. यानंतर आरपीएफने त्या व्यक्तीच्या हाता, पायांना मालिश करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. यावळी रुग्णाला प्रथम उपचार सुरु झाला होता.
#RPSF constable Ashok Kumar and constable Niranjan Singh provided immediate assistance to a passenger found unconscious at mathura railway station, Gave CPR in the Golden hour, arranged Ambulance and quickly shifted him to the hospital for necessary treatment.#SewaHiSankalppic.twitter.com/682sxGNYW5
— RPF INDIA (@RPF_INDIA) October 1, 2022
ही गर्दी पाहून आरपीएफचे अशोक कुमार आणि निरंजन सिंह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी केशवन यांना पाहताच त्यांची स्थिती समजली. त्यांनी लगेच त्या पत्नीला पतीला तोंडातून श्वास देण्यास सांगितले.काही वेळातच केशवन यांना शुध्द आली. यानंतर लगेच आरपीएफने रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल केले.