पत्नीच्या आजारपणामुळे पतीने घेतली व्हीआरस, निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 21:23 IST2024-12-25T21:22:23+5:302024-12-25T21:23:22+5:30
निवृत्तीच्या दिवशी कार्यालयात आयोजित कार्यक्रमातच पत्नीने प्राण सोडले.

पत्नीच्या आजारपणामुळे पतीने घेतली व्हीआरस, निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू...
कोटा: राजस्थानच्या कोटामधून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. आजारी पत्नीसाठी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीवर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांनी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार केला. यानंतर तात्काळ महिला खाली कोसळली अन् जागीच मृत्यू झाला.
सविस्तर माहिती अशी की, देवेंद्र चंदन, हे सेंट्रल वेअरहाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पत्नीच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मंगळवारी त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयातच एक छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवेंद्रसोबत त्यांची पत्नी दीपिकाही डाकनिया येथील कार्यालयात पोहोचल्या होत्या.
आजारी असणाऱ्या दीपिका त्या दिवशी खूप खुश होती. पती निवृत्तीनंतर आता पूर्णवेळ आपल्याजवळ असणार, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमात सर्वांनी जोडप्याचे स्वागत केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. पण, यादरम्यान अचानक दीपिका यांची प्रकृती खालावली आणि त्या खाली कोसळल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे देवेंद्र यांना खूप मोठा धक्का बसला आहे.