पती-पत्नीच्या नात्याची अजब कहाणी, 9 वर्षाच्या मुलीची करावी लागणार डीएनए टेस्ट आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:47 PM2023-01-25T13:47:18+5:302023-01-25T13:49:07+5:30

कोणताही पुरावा नसल्याने त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. नंतर महिलेने मुलीची डीएनए टेस्ट केली आणि ती मॅच झाल्यानंतर परिवार तिला स्वीकारण्यास तयार झाला.

Husband wife relationship strange case when DNA test of 9 year old daughter had to be done | पती-पत्नीच्या नात्याची अजब कहाणी, 9 वर्षाच्या मुलीची करावी लागणार डीएनए टेस्ट आणि मग...

पती-पत्नीच्या नात्याची अजब कहाणी, 9 वर्षाच्या मुलीची करावी लागणार डीएनए टेस्ट आणि मग...

googlenewsNext

उत्‍तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधून पती-पत्नीच्या एका नात्याची अजब घटना समोर आली आहे. इथे दिल्लीहून आलेल्या महिलेने शाहजहांपूरमध्ये तैनात मृत फिल्ड ऑफिसर आपला पती असल्याचं सांगितलं. फिल्ड ऑफिसर दिल्लीत राहणाऱ्या या महिलेसोबत लिव्हिंग रिलेशनमध्ये होता आणि त्यांना एक मुलगीही होती. एका अपघातात फिल्ड ऑफिसरचा मृत्यू झाला. तेव्हा महिलेला मुलीसोबत त्याच्या परिवारासोबत रहायचं होतं. तर दुसरीकडे त्याच्या परिवारातील लोक तिला स्वीकारण्यास तयार नव्हते. कोणताही पुरावा नसल्याने त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. नंतर महिलेने मुलीची डीएनए टेस्ट केली आणि ती मॅच झाल्यानंतरच परिवार तिला स्वीकारण्यास तयार झाला.

ही घटना जैतीपूरच्या बॅंक ऑफ बडोदातील आहे. जैतीपूर शाखेत तैनात फिल्ड ऑफिसर 34 वर्षीय हितेश कुमारचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर दिल्लीहून आलेल्या एका महिलेने ती त्याची पत्नी असल्याचं सांगितलं. पण त्याच्या परिवाराने महिलेले सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले की, हितेशचं अजून लग्न झालेलं नाही. तर महिला म्हणाली की, हितेश आणि तिचं लग्न झाल्यावर त्याने तिला दिल्लीला ठेवलं होतं. त्यांना 9 वर्षांची एक मुलगी आहे.

मुळचा हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात राहणारा हितेश कुमार बॅंक ऑफ बडोदामध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये देहरादूनहून ट्रांसफर होऊन जैतीपूरला आला होता. तो तिथे एका भाड्याच्या घरात राहत होता. रात्री त्याचा मृतदेह घरात आढळून आला. आजूबाजूला रक्त होतं. दिल्लीहून 9 वर्षाच्या मुलीसोबत माया देवी तसेच हितेशचे नातेवाईक शाहजहांपूरला पोहोचले.

मायाने ती त्याची पत्नी असल्याचं सांगितलं. पण हितेशच्या कुटुंबाने तिला स्वीकारलं नाही. यावरून त्यांच्यात वाद झाला. सूचना मिळताच पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून शांत केलं. 

माया देवीने सांगितलं की, हितेश आणि तिची हरिव्दारमध्ये भेट झाली होती. प्रेम संबंध झाल्यानंतर देहरादूनमध्ये तैनात हितेश तिच्या संपर्कात होता. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. ती म्हणाली की, हितेश शनिवारी आणि रविवारी तिच्याकडे येऊन राहत होता. सुट्टी असली तरी तो तिथेच यायचा. पण कधीच त्याने तिला परिवारासमोर नेलं नाही.

हिमाचल प्रदेशातून आलेल्या हितेशच्या मावशी तो अविवाहित असल्याचं सांगितलं. हितेशने मायासोबत लग्न केल्याचं आपल्या परिवाराला सांगितलं नव्हतं. त्याच्या मृत्यूनंतर माया समोर आली. ते म्हणाले की, मायाने याबाबत काही पुरावा द्यावा. माया म्हणाली की, मुलगी हितेशची आहे. तेव्हा हितेशची मावशी गंगा देवी म्हणाली की, मुलीची डीएनए टेस्ट केली जावी. जर टेस्ट मॅच झाली तर ते तिला स्वीकारतील.

दोन्ही परिवारांमध्ये वाद झाला. पोलिसांना तो शांत केला. पोलिसांनी पोस्टमार्टम दरम्यान हितेशचा डीएनए सॅम्पल घेतला. जेणेकरून कोर्टात ते दाखवता येईल. सध्या लग्नानंतर लिव्हिंत रिलेशनमध्ये राहिल्यावर कोणताही पुरावा नसल्याने माया आणि तिच्या मुलीचं जीवन धोक्यात आलं आहे.

Web Title: Husband wife relationship strange case when DNA test of 9 year old daughter had to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.