सरकारी कार्यालयात महिलेऐवजी पती काम करतना दिसला, SDMने केला थप्पडांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:52 PM2022-05-23T18:52:05+5:302022-05-23T18:52:29+5:30
अंगणवाडी सेविकेऐवजी पतीला काम करताना पाहून एसडीएमने कानशिलात लगावल्या आणि पतीविरोधात एफआयआर नोंदवला.
बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका एसडीएमने अंगणवाडी सेविकेच्या पतीला कानशिलात लगावल्याची घटना घढली आहे. सरकारी कार्यालयात अंगणवाडी सेविकेच्या जागी पतीला काम करताना पाहून चौकशीसाठी आलेले एसडीएम भडकले. पतीला याचा जाब विचारत असताना अधिकाऱ्याने महिलेच्या पतीवर थप्पडांचा वर्षाव केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, महनारचे एसडीएम सुमित कुमार यांना माहनार ब्लॉक कार्यालयत दलालांचा सुळसुळाट झाला असून, महिला कर्मचाऱ्यांऐवजी त्यांचे पती कार्यालयात काम करत असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीवरून एसडीएम सुमित कुमार चौकशीसाठी अंगणवाडीशी संबंधित सीडीपीओ कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांना सेविकेऐवजी तिचा पती घटनास्थळी आढळून आला.
यावेळी महिला कर्मचारी राधा कुमारीऐवजी तिच्या पतीला काम करताना पाहून एसडीएमचा ताबा सुटला आणि त्यांनी अशोक पासवान याला कानशिलात लगावली. यावेळी एसडीएम स्थानिक सीडीपीओ एसडीएमवरही संतापले आणि याचा जाब विचारला. यानंतर, एसडीएमच्या आदेशानुसार अशोकविरुद्ध एफआयआर नोंदवण्या आली.