पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या पतीस शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:16+5:302016-03-11T22:26:16+5:30
जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सुक्राम ओंकार कोळी (वय ५५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
ज गाव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सुक्राम ओंकार कोळी (वय ५५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.सुक्राम कोळी याने त्याची पत्नी सोनाबाई सुक्राम कोळी यांच्यावर १४ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी धारदार चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्लात गंभीर जखमी झालेल्या सोनाबाई यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार सुक्रामविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.नऊ साक्षीदार तपासलेहा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. लव्हेकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षातर्फे ॲड.अनुराधा वाणी यांनी नऊ साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा धरत न्यायालयाने सुक्रामला भादंवि कलम ३०७ नुसार पाच वर्ष सक्तमजुरी व हजार रुपये दंड; दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा तसेच भादंवि कलम ५०४ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. आरोपीतर्फे ॲड.शैलेश देसले यांनी काम पाहिले.