धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:08 PM2022-08-23T16:08:17+5:302022-08-23T16:09:03+5:30

"जेव्हा मी सुटेन, तेव्हा निश्चितपणे व्हिडिओचा दुसरा भागही अपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. मी धर्मासाठी मरायलाही तयार आहे."

Hyderabad bjp mla t raja singh prophet muhammad controversy raja singh says my fight for dharma | धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

googlenewsNext

 
हैदराबादमधील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीवर निशाणा साधताना पैगंबर मोहम्मद यांच्यासंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटकेदरम्यान टी. राजा सिंह म्हणाले, मी हे धर्मासाठी करत आहे. यासाठी मी मरायलाही तयार आहे. 

काय म्हणाले राजासिंह? - 
टी. राजा सिंह म्हणाले, 'त्यांनी यूट्यूबवरून माझा व्हिडिओ हटवला आहे. पोलीस नेमके काय करणार, हे आपल्याला माहीत नाही. जेव्हा मी सुटेन, तेव्हा निश्चितपणे व्हिडिओचा दुसरा भागही अपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. मी धर्मासाठी मरायलाही तयार आहे.'

राजा सिंह म्हणाले, 'तक्रारी का दाखल करण्यात आल्या आहेत? आमचे राम, राम नहीत? आमच्या सीता, सीता नहीत? मी डीजीपी यांना हात जोडून विनंती केली होती, की त्यांनी राम आणि सीता यांच्या विरोधात आक्षेपार्ह कॉमेडी करणाऱ्या व्यक्तीला (मुनव्वर फारुकी) कार्यक्रमाची परवानगी देऊ नये.’ खरे तर, मुनव्वर फारूकीचा 20 ऑगस्टला हैदराबादमध्ये एक कार्यक्रम झाला होता. याला टी. राजा सिंह यांनी विरोध केला होता. यापार्श्वभूमीवर त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. त्यांच्या विरोधानंतरही हा कार्यक्रम झाला होता. यानंतर, या  कार्यक्रमाला उत्तर देताना ते एका व्हिडिओमध्ये बोलत होते.

याच दरम्यान राजा सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भात  वक्तव्य केले होते. यावरूनच सध्या गदारोळ निर्माण झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास दबीरपूरसह हैदराबादच्या अनेक भागांत हजारों मुस्लीम नागरिकांनी निदर्शन केले. यानंतर पोलिसांनी राजासिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 
 

Web Title: Hyderabad bjp mla t raja singh prophet muhammad controversy raja singh says my fight for dharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.