ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांच्या मृत्यूनंतर आईने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:46 PM2022-06-06T12:46:15+5:302022-06-06T12:47:24+5:30

Online Game : एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल 36 लाखांचं नुकसान केलं आहे.

hyderabad boy loe 36 lakh playing Online mobile game | ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांच्या मृत्यूनंतर आईने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांच्या मृत्यूनंतर आईने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

Next

नवी दिल्ली - ऑनलाईन गेमची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. याच नादापायी अनेक धक्कादायक घटना घडल्याचं देखील खूप वेळा समोर आलं आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. हैद्राबादमध्ये हैराण करणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल 36 लाखांचं नुकसान केलं आहे. हैद्राबादमधील अंबरपेट भागात राहणाऱ्या या मुलाने ऑनलाईन गेमचे पैसे भरण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्याचा वापर केला.

हैद्राबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनुसार, मुलाने आपल्या आजोबांच्या मोबाईलवर एक फ्री फायर गेमिंग एप (Free Fire App) डाउनलोड केला होतं. गेम खेळण्यासाठी सुरुवातीला 1500 रुपये आणि नंतर बँक खात्यातून 10 हजार रुपये लागणार होते. त्याला खेळाचं व्यसन लागल्यानंतर तो कुटुंबाला न सांगता यासाठी पैसे खर्च करू लागला. दिवंगत पोलीस अधिकाऱ्यांचा अकरावीत शिकणारा हा मुलगा 1.45 लाख रुपयांपासून 2 लाखांपर्यंत पैसे भरत होता. 

जेव्हा त्याची आई पैसे काढण्यासाठी SBI बँकेत गेली, तर त्यात पैसे नसल्याचं कळालं. हे ऐकताच तिला धक्का बसला. खात्यातून एकूण 27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर तिने HDFC बँकेतून खात्याचा तपास केला तर त्यातूनही 9 लाख रुपये गायब झाले होते. महिलेने सायबर क्राइमकडे याबाबत तक्रार केली. तिने पोलिसांना सांगितलं की, पतीच्या मृत्यूनंतर आलेली रक्कम तिने दोन बँकेत ठेवली होती. मात्र मुलाच्या कारनाम्याने तिला मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hyderabad boy loe 36 lakh playing Online mobile game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन