पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:55 AM2024-05-08T10:55:37+5:302024-05-08T10:56:06+5:30

Hyderabad Building Collapse: मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला.

hyderabad building collapse due to heavy rain seven people died include four year child | पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

हैदराबादमधील बाचूपल्ली परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यू झालेले लोक हे ओडिशा आणि छत्तीसगड येथील स्थलांतरित कामगार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करण्यात आले, ज्याच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हैदराबाद आणि तेलंगणातील अनेक भागात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपत्ती निवारण दल (DRF) पथके पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

हवामान खात्याचा इशारा

केवळ हैदराबाद आणि तेलंगणामध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांनी अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असंही सांगण्यात आलं आहे. प्रधान सचिव (महानगरपालिका प्रशासन आणि नागरी विकास) दानकिशोर यांनी GHMC आयुक्त रोनाल्ड रोझ यांच्यासह शहरातील विविध जलयुक्त भागांना भेट दिली आणि ठिकठिकाणी DRF पथकं तैनात करून बचावकार्याच्या सूचना दिल्या.

मुसळधार पावसामुळे पडले विजेचे खांब 

वादळ आणि पावसामुळे पाणीपुरवठा, वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडल्यामुळे लोकांच्या घरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची विविध पथकं शहरातील अनेक भागात पाठवण्यात आली आहेत. अनेक भागातील पडलेली झाडं हटवत आहेत. पावसाचा लोकांना मोठा फटका बसला आहे. 
 

Web Title: hyderabad building collapse due to heavy rain seven people died include four year child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस