Hyderabad Case: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या, हैदराबादेत फटाके, मिठाई अन् जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 12:19 PM2019-12-06T12:19:58+5:302019-12-06T12:21:53+5:30

Hyderabad Case : हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर कारवाईनंतर हैदराबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत.

Hyderabad Case: Women tied up rakhi with police, crackers in Hyderabad, sweets and gallows after encounter by police | Hyderabad Case: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या, हैदराबादेत फटाके, मिठाई अन् जल्लोष

Hyderabad Case: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या, हैदराबादेत फटाके, मिठाई अन् जल्लोष

googlenewsNext

हैदराबाद - 'दिशा' रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे. मात्र, नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. जनभावना पोलिसांच्या पाठिशी असल्याचं दिसून येतंय.

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर कारवाईनंतर हैदराबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत. पोलिसांनी जे केलं ते योग्यच, अशा भावना सोशल मीडियावरुन व्यक्त होत आहेत. तर, हैदराबाद पोलिसांना राखी बांधून, खांद्यावर उचलून आणि फटाके वाजवून हैदराबादमधील नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. दिशा रेड्डीच्या पीडित कुटुंबीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलांनी हैदराबाद पोलिसांचं चक्क राखी बांधून अभिनंदन आणि आभार मानलयं. तर, घटनास्थळावर गेलेल्या नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केलाय. तसेच, फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केलाय. 


सोशल मीडियावरुनही मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक होत आहेत. पोलिसांच्या कार्याला सलाम देणारे मेसेज, मिम्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ट्विटरवर #encounter #hyderabadsingham हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. सोशल मीडियावर हैदराबाद पोलीस आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जावर हे सिंघम बनले आहेत. काहींनी सोशल मीडियावर हैदरबाद पोलिसांचं कौतुक करताना, इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा भावनाही व्यक्त होत आहेत.


 

Web Title: Hyderabad Case: Women tied up rakhi with police, crackers in Hyderabad, sweets and gallows after encounter by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.