डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:10 PM2019-11-30T13:10:58+5:302019-11-30T13:23:14+5:30
हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे.
हैदराबाद - हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित तरुणीने आराडाओरडा केला असता तिचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी पीडितेला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Hyderabad: Protest outside Shadnagar Police Station against the alleged rape and murder of a woman veterinary doctor. #Telanganapic.twitter.com/K3I7WtQYPV
— ANI (@ANI) November 30, 2019
पीडितेच्या हत्येनंतर हा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला असून देशभरातील असंख्य ट्विटर वापरणाऱ्यांनी या घटनेबद्दल खेद आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी आरोपीला डॉक्टर तरुणीला जाळून मारले त्याप्रमाणे सर्व लोकांसमोर आरोपींना जाळून मारा. तर काहींनी आरोपींना फासावर चढवा असा संतप्त प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
Cyberabad Police on rape and murder of a woman veterinary doctor: Request will be made to handover the case to the fast track court, Mahbubnagar to expedite the prosecution for maximum punishment to the accused persons. #Telanganahttps://t.co/CBbVV02J0z
— ANI (@ANI) November 29, 2019
पीडिता शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेला काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितेनं फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दूधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितेचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.