हैदराबाद: २०० बालकामगारांची सुटका

By admin | Published: January 24, 2015 10:40 AM2015-01-24T10:40:23+5:302015-01-24T10:54:08+5:30

हैदराबाद पोलिसांनी छापा टाकून शनिवारी सुमारे २०० बालकामगारांची सुटका केली. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Hyderabad: Rescue of 200 juvenile workers | हैदराबाद: २०० बालकामगारांची सुटका

हैदराबाद: २०० बालकामगारांची सुटका

Next

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. २४ - हैदराबाद पोलिसांनी छापा टाकून शनिवारी सुमारे २०० बालकामगारांची सुटका केली. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीनगर परिसरात हा छापा टाकण्यात आला, या कारवाईत सुमारे ५०० पोलीस सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश व बिहारमधून या बालकामगारांना बालमजुरीसाठी शहरात आणण्यात आले  व त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २०हजार रुपये देण्यात आले. या बालकांकडून बांगड्या तसेच चपला-बूट तयार करणे आदी कामे करून घेण्यात येत होती. त्यांना अत्यंत गलिच्छ परिसरात ठेवण्यात येत होते. 

 
 

Web Title: Hyderabad: Rescue of 200 juvenile workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.