घराला आग, रेस्कूसाठी पोलीस आत शिरले अन् हाती लागलं पैशांच घबाड; पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 05:16 PM2023-05-14T17:16:00+5:302023-05-14T17:16:44+5:30
हैदराबादमधून ही विचित्र घटना समोर आली आहे.
हैदराबादच्या सिकंदराबादमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील रेजिमेंट मार्केटमध्ये भीषण आग लागली, लोकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. आग विझविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पैशांच घबाड सापडलं. हे पैसे पाहून पोलिसही चक्रावले.
आज सकाळी सिकंदराबाद येथील रेजिमेंटल बाजार येथील एका घराला आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आग विझवली. यानंतर घरात अडकले आहे किंवा कोणी जखमी अवस्थेत आहे, याची तपासणी पोलीस करत होते. यावेळी पोलिसांना बेडरुममध्ये पैशांचा ढिग दिसला. 1 कोटी 64 लाखांची रोकड आणि सोने-चांदी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
हैदाराबाद के सिकंदराबाद स्थित रेजिमेंटल बाजार में एक घर में आग लग गई. मगर चौंकाने वाली बात यह है कि आग बुझाने के बाद इस घर में पुलिस को भारी मात्रा में हवाला के रुपए बरामाद हुए. pic.twitter.com/KXOfXzABR8
— Vineet Tripathi (@vineet8aug) May 14, 2023
या घराचे मालक श्रीनिवास असल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेली ते घरात नव्हते. ते एका कंपनीत डीजीएम म्हणून काम करतात. शासन याच कंपनीमार्फत विद्युत कराराचा व्यवसाय करते. पोलिसांनी संपूर्ण रक्कम जप्त करुन पोलीस ठाण्यात नेली आहे. हा हवालाचा पैसा असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत.