हैदराबादमध्ये तंदूर हत्याकांडाची पुनरावृत्ती, पत्नीचे तुकडे करून केला जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: July 6, 2016 01:11 PM2016-07-06T13:11:51+5:302016-07-06T15:34:39+5:30

पत्नीच्या अफेअरमुळे संतापलेल्या पतीने तिची हत्या करून, तिच्या शरीराचे तुकडे करून ते जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली.

In Hyderabad, tandoor killings were repeated, wife tried to break into pieces | हैदराबादमध्ये तंदूर हत्याकांडाची पुनरावृत्ती, पत्नीचे तुकडे करून केला जाळण्याचा प्रयत्न

हैदराबादमध्ये तंदूर हत्याकांडाची पुनरावृत्ती, पत्नीचे तुकडे करून केला जाळण्याचा प्रयत्न

Next
>
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ६ - दोन दशकांपूर्वीच्या दिल्लीतील कुख्यात 'तंदूर हत्या'प्रकरणाची आठवण करून देणारा प्रसंग हैदराबादमध्ये घडला असून पत्नीच्या अफेअरमुळे संतापलेल्या स्टॉक ब्रोकरने पत्नीची हत्या करून, तिच्या शरीराचे तुकडे करून ते जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एम.रुपेश कुमार अगरवाल या ३६ वर्षीय इसमाला त्याची पत्नी सिंथिया (वय ३१) हिच्या खुनाच्या आरोपाखाली सोमवारी रात्री अटक केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश व सिंथियाचे २००८ साली काँगो येथे लग्न झाले. मुळची आफ्रिकेतील असणारी सिंथिया ही क्लब डान्सर म्हणून काम करत होती. २००८ साली रुपेशशी लग्न झाल्यानंतर ती हैदराबादमध्ये आली, त्या दोघांना ७ वर्षांची मुलगीही आहे. 
फेसबूकवरून सिंथियाची एका फ्रेंच इसमाशी मैत्री झाली व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर सिंथियाने रुपेशकडून घटस्फोटाची मागणी केली. याच मुद्यावरून रविवारी त्यांचे जोरदार भांडणही झाले. सिंथियाला त्या फ्रेंच नागरिकाशी लग्न करून मुलीसह फ्रान्सला जाण्याची इच्छा होती, रुपेशला मात्र हे मान्य नव्हते आणि आपल्या पत्नीचे दुस-याशी असलेले अफेअर आवडतही नव्हते. याच मुद्यावरून झालेल्या वादानंतर रुपेशने सिंथियाचा गळा दाबून तिची हत्या केली व तिच्या शरीराचे तुकडे करून एका सुटकेसमध्ये कोंबले. त्यानंतर ती सुटकेस गाडीत टाकून रुपेश शमशबाद येथील मडनपल्ली गावातील निर्जन भागात पोहोचला व त्याने ती सूटकेस जाळून टाकली. मात्र तेथून परत येताना त्याची गाडी चिखलात अडकली असता त्याने स्थानिकांकडे मदत मागितली. मात्र काही नागरिकांना त्याच्या गाडीत रक्ताचे डाग दिसले व बाजूच्याच झुडूपात काहीतरी जळताना आढळले. ते पाहून त्या नागरिकांना रुपेशचा संशय आला व त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आग विझवून सुटकेस उघडताच त्यांना त्यामध्ये शरीराचे तुकडे आढळले. पोलिसांनी रुपेशला ताब्यात घेत खाक्या दाखवताच रुपेशने आपला गुन्हा कबूल केला. 
या प्रकरणामुळे दिल्लीतील तंदूर मर्डर केसच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. १९९५ साली दिल्लीतील आमदार सुशील शर्माने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून तिचा खून करून, तिचे तुकडे करून तंदूर भट्टीमध्ये टाकले होते. 
 

Web Title: In Hyderabad, tandoor killings were repeated, wife tried to break into pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.