विना शेती व मातीद्वारे चार्याची निर्मिती हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर : कुसुंबा गो-शाळेत ५०० गायींसाठी चार्याची व्यवस्था
By admin | Published: March 21, 2016 12:21 AM2016-03-21T00:21:55+5:302016-03-21T00:21:55+5:30
विलास बारी
Next
व लास बारीजळगाव - दुष्काळीस्थिती आणि अन्न धान्यांच्या उत्पादना दरम्यान चार्याच्या लागवडीसाठी न मिळणारे शेतीचे क्षेत्र यामुळे गुरांच्या चार्यांची टंचाई निर्माण होत आहे. त्यावर पर्याय शोधत कुसुंबा येथील अहिंसातिर्थ गो-शाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व मातीचा वापर न करता मक्यापासून चार्याची निर्मिती केली जात आहे. प्रायोगिक तत्वावर १० गायींसाठी सध्या हा चारा तयार केला जात असून लवकरच ५०० गायींना पुरेल इतक्या चार्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार आहे.दुष्काळीस्थितीमुळे चार्याची टंचाईगेल्यावर्षी वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाला. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत जिल्हाभरात सरासरी ६६३.३ मि.मी.च्या तुलनेत केवळ ४२६.९४ मि.मी.पाऊस झाला. अवघा ६४ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनासोबतच पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. शेतातील उत्पादन कमी आले. त्यातच पुरेसा चारा नसल्याने गायी व म्हशींच्या संगोपनाची चिंता शेतकर्यांना सतावत आहे.हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चार्याची उगवणकुसुंबा येथील गो-शाळेत तीन हजारापेक्षा जास्त गायी, बैल, वासरे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चार्याची आवश्यकता भासत असल्याने गो-शाळेकडून जिल्हा व परजिल्ह्यातून ओला व सुका चारा मागवावा लागत आहे. त्यातच गो-शाळेचे व्यवस्थापक अभयसिंग व साहाय्यक व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चार्याच्या निर्मितीवर भर दिला.कशी आहे चारा निर्मितीची प्रक्रियासध्या या गो-शाळेत १० गायींसाठी चारा तयार होईल अशी व्यवस्था तयार केली आहे. सुरुवातीला जितका चारा तयार करायचा आहे, त्या प्रमाणानुसार मका काढून तो साफ केला जातो. त्यानंतर रात्रभर या मक्याला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये साठवून ठेवण्यात येते. सकाळी पाणी काढून मका विशिष्ट पद्धतीच्या ट्रेमध्ये ठेवण्यात येतो. हे सर्व ट्रे एका रॅकमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्प्रिकलरच्या साहाय्याने एक तासाच्या अंतराने मका साठविलेल्या ट्रे वर फवारा मारण्यात येत असतो. या दरम्यान चारा तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते.