मी दलित असल्याने माझ्यावर कारवाई, संदीप कुमार यांचा आरोप

By admin | Published: September 1, 2016 12:22 PM2016-09-01T12:22:55+5:302016-09-01T12:27:58+5:30

सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्याने पक्षातून निलंबित करण्यात आलेले संदीप कुमार यांनी व्हीडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आपण नसून दलित असल्यानेच आपल्यावर कारवाई केली असल्याचा दावा केला आहे

I am being a Dalit, accused of Sandeep Kumar | मी दलित असल्याने माझ्यावर कारवाई, संदीप कुमार यांचा आरोप

मी दलित असल्याने माझ्यावर कारवाई, संदीप कुमार यांचा आरोप

Next
- ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 - सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्याने पक्षातून निलंबित करण्यात आलेले संदीप कुमार यांनी व्हीडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आपण नसून दलित असल्यानेच आपल्यावर कारवाई केली असल्याचा दावा केला आहे. संदीप कुमार यांच्यासंबंधी एक सेक्स टेप समोर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाई करत संदीप कुमार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.
 
(सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या मंत्र्याला केजरीवालांनी हटवलं)
 
'त्या व्हीडिओत मी नाही आहे. मी दलित असल्याची किंमत चुकवतो आहे', असं संदीप कुमार बोलले आहेत. 'ज्याप्रमाणे एकलव्याला खाली खेचण्यात आलं होतं, त्याप्रमाणे आम्हाला नष्ट करण्यासाठी हा कट रचला गेलाय. मी जेव्हापासून आंबेडकरांचा पुतळा बसवला होता तेव्हापासून मला टार्गेट केलं जात होतं. मी गरीब आणि दलित असल्याने मला टार्गेट केलं गेलं', असा आरोप संदीप कुमार यांनी केला आहे.
 
2015मध्ये झालेल्या निवडणुकीत संदीप कुमार आमदार म्हणून निवडून आले होते. या सर्व प्रकरणावर केजरीवाल मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. "आम्हाला संदीप कुमार यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह सिडी सापडली आहे. सिडी पाहिल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांची हकालपट्टी केली आहे. आम आदमी पार्टीमध्ये भ्रष्टाचार आणि निंदनीय कृत्यांना थारा नाही."
 
"आम आदमी पार्टी ही शून्य टक्के भ्रष्टाचारावर काम करते. आमच्या जवळ 67 आमदार आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत," असा इशाराही मनीष सिसोदिया यांनी दिला. याआधीही असिम अहमद खान आणि जितेंद्र सिंग तोमर यांनाही मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं होतं.
 

Web Title: I am being a Dalit, accused of Sandeep Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.