'मी सध्या व्यस्त आहे, संध्याकाळी बोलेन...', शहीद कर्नल मनप्रीत सिंह यांचे कुटुंबियांना शेवटचे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:39 PM2023-09-14T18:39:48+5:302023-09-14T18:40:13+5:30
कर्नल मनप्रीत सिंह हे मोहाली जिल्ह्यातील भदौंजिया गावचे रहिवासी होते.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत देशाने तीन पुत्र गमावले. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष आणि डीएसपी हुमायून भट हे शहीद झाले.दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंह बुधवारी सकाळी अनंतनागमध्ये पुन्हा ऑपरेशन सुरू करणाऱ्या बटालियनचे नेतृत्व करत होते. गोळीबारात तो गंभीर जखमी झाले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
"बढाया मारणं बास झालं, आता...", अनंतनाग चकमकीच्या घटनेवरून फारुख अब्दुल्ला संतापले
या ऑपरेशनपूर्वी कर्नल मनप्रीत यांनी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. सिंह कुटुंबीयांशी बोलताना म्हणाले होते की, मी सध्या व्यस्त आहे आणि संध्याकाळी बोलेन. कर्नल मनप्रीत सिंह यांनी १७ वर्षांची सेवा पूर्ण केली होती, ते ४१ वर्षांचे होते, कर्नल मनप्रीत सिंह मोहाली जिल्ह्यातील भदौंजिया गावचे रहिवासी होते. त्यांची ६८ वर्षीय आई मनजीत कौर त्यांचा धाकटा भाऊ संदीप सिंह यांच्यासोबत राहतात, त्यांना आज पहाटे ५:३० वाजता कर्नल मनप्रीत यांच्या हौतात्म्याची माहिती मिळाली.
कर्नल मनप्रीत यांनी आपल्या लहान भावाला २ दिवसांपूर्वी सांगितले होते की, ते लवकरच सुट्टीवर येणार आहेत. त्यांचे दिवंगत वडील लखमीर सिंह हे सैन्यात सीपाई म्हणून भरती झाले आणि हवालदार पदावरून निवृत्त झाले, त्यांचे काकाही सैन्यात कार्यरत होते.
२०२१ मध्ये सेना पदक
कर्नल मनप्रीत सिंह यांना २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल सेना पदक देण्यात आले होते. कर्नल मनप्रीत सिंह यांनी एकूण १७ वर्षांच्या सेवेत ५ वर्षे राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये सेकंड इन कमांड आणि नंतर कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले होते. पुढील ४ महिन्यांत ते राष्ट्रीय रायफल्समधील कार्यकाळ पूर्ण करणार होते.
शहीद कर्नल मनप्रीत सिंह यांनी मुल्लापूर, मोहाली येथील सरकारी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना २००३ मध्ये लेफ्टनंट कर्नल आणि २००५ मध्ये कर्नल म्हणून बढती मिळाली. त्यांच्या पश्चात पत्नी जगमीत ग्रेवाल, आई आणि दोन मुले आहेत. यात एक ६ वर्षांचा मुलगा आणि २ वर्षांची मुलगी आहे.