आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:27 AM2022-05-26T11:27:57+5:302022-05-26T11:31:36+5:30

बांदी संजय कुमार हे बुधवारी रात्री करीमनगर येथे आयोजित एका विशाल 'हिंदू एकता यात्रे'ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

I am challenging Owaisi that we will dig all mosques in state If dead bodies recovered, you claim it If Shivalinga is found hand it over to us says Telangana BJP chief Bandi SK | आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान

आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान

googlenewsNext

 
हैदराबाद - वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरातील सर्व्हेमध्ये कथित शिवलिंग सापडल्यानंतर, सातत्याने राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता तेलंगणा भाजप प्रमुख बांदी एसके यांनी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना थेट आव्हान दिले आहे. आम्ही राज्यातील सर्व मशिदींचे उत्खनन करू. जर तेथे शिवलिंग आढळले तर त्या आम्हाला सोपवा, असे बांदी एसके यांनी म्हटले आहे.

बांदी एसके म्हणाले, ''जेथे कुठे मशीद परिसरात खोदकाम केले जाते, तेथे शिवलिंग आढळते. मी ओवेसींना आव्हान करतो, की आम्ही राज्यातील सर्व मशिदी खोदू. जर मृतदेह आढळले, तर त्या तुमच्या (मुस्लिमांच्या) आणि शिवलिंग आढळले तर त्या तुम्ही आमच्या स्वाधीन करा. तुम्हाला हे स्वीकार कराल?''

बांदी संजय कुमार हे बुधवारी रात्री करीमनगर येथे आयोजित एका विशाल 'हिंदू एकता यात्रे'ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कुमार यांनी दावा केला, की भूतकाळात मुस्लीम शासकांनी तेलंगाणामध्ये अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या जागी मशिदी बांधल्या. 
 

Web Title: I am challenging Owaisi that we will dig all mosques in state If dead bodies recovered, you claim it If Shivalinga is found hand it over to us says Telangana BJP chief Bandi SK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.