कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 02:28 PM2019-05-13T14:28:35+5:302019-05-13T14:29:47+5:30

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेली लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अधिकच तीव्र झाली आहे.

I am chanting Jai Shri Ram here & leaving for Kolkata, arrest me if you have guts - Amit Shah | कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान 

कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान 

Next

जॉयनगर - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेली लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अधिकच तीव्र झाली आहे. दरम्यान, आज जॉयनगर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जींना थेट आव्हान दिले आहे. जॉयनगर येथील प्रचारसभेत जय श्री राम च्या घोषणा अमित शहा यांनी दिल्या. तसेच या रॅलीनंतर मी कोलकात्याला जात आहे. ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अटक करून दाखवावे, असे आव्हान अमित शहा यांनी दिले. 





''आज बंगालमध्ये माझ्या तीन सभा होत्या. मला जाधवपूर येथेही सभा घ्यायची होती. या मतदारसंघातून ममता बॅनर्जींचे भाचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपाला दिलेल्या सभेची परवानगी रद्द केली. आता आम्हाला बोलू द्या अथवा न बोलू द्या. लोकसभा निवडणुकीत टीएमसीला पराभूत करण्याचे बंगालमधील जनतेने निश्चित केले आहे.'' असे अमित शहा म्हणाले. 





 यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जींच्या भाच्यावरही टीका केली. ममता बॅनर्जीं यांनी आपल्या भाचासोबत मिळून सिंडिकेट्स बनवले आहे. इथे लोकांकडून विनाकारण कर वसूल केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाचा कर वसूल करत आहेत. 

अमित शहा यांनी बंगालमधील दुर्गा पूजेवरूनही ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ''दुर्गा पूजा ही बंगालची ओळख आहे. पण ममता बॅनर्जी यांनी या दुर्गापूजेवरही निर्बंध आणले. सरस्वती पूजा केली तर ममता बॅनर्जींचे गुंड मारामारी करतात. श्रीराम बोलू शकत नाही कारण ममता बॅनर्जींना गुंडांची मते हवी आहेत. बंगालमध्ये भाजपाला 23 लोकसभेच्या जागा मिळाल्या तर इथे पुन्हा एकदा सन्मानाने दुर्गापूजा सुरू होईलस असेही अमित शहा यांनी सांगितले.  

Web Title: I am chanting Jai Shri Ram here & leaving for Kolkata, arrest me if you have guts - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.