मी काँग्रेसमध्येच! राहुल गांधींच्या भेटीनंतर नारायण राणेंकडून स्पष्ट
By admin | Published: April 5, 2017 11:33 PM2017-04-05T23:33:39+5:302017-04-05T23:42:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून असंतुष्ट असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज आपण पक्ष सोडून भाजपात जाणार नसल्याचे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - गेल्या काही दिवसांपासून असंतुष्ट असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज आपण पक्ष सोडून भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आज नवी दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्षात समाधानी असल्याचे सांगत पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
पक्षात मिळत असलेले दुय्यम स्थान, काँग्रेसची निवडणुकांमध्ये होत असतेली सुमार कामगिरी आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे नारायण राणे हे गेल्या काही काळापासून नाराज होते. त्यातच त्यांनी राज्यातील नेत्यांवर थेट टीका करण्यास सुरुवात केल्याने राणे काँग्रेस सोडून जाणार अशा चर्चांना उत आला होता. नारायण राणे शिवसेनेत स्वगृही परतणार किंवा सध्या प्रबळ झालेल्या भाजपाची वाट धरणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
पण आज संध्याकाळी राणे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 20 मिनिटे चाललेल्या या भेटीत राणेंनी राज्यातील काँग्रेसच्या कामकाजाविषयीच्या आपल्या भावना गांधींसमोर मांडल्या. तसेच 2019 साली राज्यातील निवडणुकीत विजय मिळवायचा असेल, तर काय करावे लागेल, याचा संक्षिप्त आराखडाही राणेंनी गांधींसमोर मांडल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबाबत नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. समर्थकांना पदे मिळत नसल्याने राणे हे पक्षनेतृत्वावर नाराज होते.