मी दाऊद टोळीतील दहशतवादी बोलतोय, राम मंदिर बॉम्बने उडवणार; धमकीच्या फोनने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 02:22 PM2024-01-21T14:22:51+5:302024-01-21T14:23:56+5:30

आरोपी तरुण हा ११२ या क्रमांकावर सतत फोन करून मी राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देत होता.

I am Dawood gang terrorists will blow up Ram Temple with bombs threatening phone call | मी दाऊद टोळीतील दहशतवादी बोलतोय, राम मंदिर बॉम्बने उडवणार; धमकीच्या फोनने खळबळ

मी दाऊद टोळीतील दहशतवादी बोलतोय, राम मंदिर बॉम्बने उडवणार; धमकीच्या फोनने खळबळ

Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच एका तरुणाने फोन करून राम मंदिर बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी दिली होती. बिहारमधील या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इंतखाब असं या २१ वर्षीय आरोपीचं नाव आहे.

आरोपी तरुण हा ११२ या क्रमांकावर सतत फोन करून मी राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देत होता. तसंच आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील असल्याचा दावाही त्याने केला होता. त्यामुळे पोलिसांनी ताबोडतोब त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी ११२ या क्रमांकावर एक फोन आला आणि समोरून मी छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम यांच्या टोळीतील दहशतवादी असल्याचं सांगितलं गेलं. तसंच २२ जानेवारी रोजी आम्ही राम मंदिर बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ज्या क्रमाकांवरून फोन आला होता, तो क्रमांक कोणाच्या नावावर आहे, याची माहिती काढली. त्यामध्ये सदर मोबाईल क्रमांक हा बलुआ कालियागंज इथं राहणाऱ्या एका तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

दरम्यान, आरोपी ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती, तो मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
 

Web Title: I am Dawood gang terrorists will blow up Ram Temple with bombs threatening phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.