Satara Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 06:16 PM2018-07-28T18:16:49+5:302018-07-28T18:20:28+5:30

या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे.

I am involved in the sadness of the families of the dead - the Prime Minister | Satara Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी- पंतप्रधान

Satara Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी- पंतप्रधान

Next

नवी दिल्ली-  पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 600 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगडमधल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचं मला दुःख आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.


तसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तीव्र दुःख झालं आहे. प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी मी प्रार्थना करत आहे.
तर राहुल गांधींनीही या अपघातातबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील रायगडमध्ये झालेल्या प्रचंड अपघातात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले. त्या दुर्दैवी घटनेबाबत मी दुःख आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करावी, असंही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आवाहन केलं आहे.

Web Title: I am involved in the sadness of the families of the dead - the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.