मी तर शांतीचा दूत, दहशतवादाशी संबंध नाही - झाकीर नाईक
By admin | Published: July 15, 2016 12:12 PM2016-07-15T12:12:37+5:302016-07-15T12:39:10+5:30
इस्लामचे अभ्यासक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी सौदी अरेबियातून स्काईपव्दारे पत्रकारपरिषदेला संबोधित केले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - इस्लामचे अभ्यासक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी सौदी अरेबियातून स्काईपव्दारे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी शांतीचा दूत आहे. शांतीसाठी प्रवचन देतो, हिसेंसाठी चिथावणी देत नाही असे झाकीर नाईक यांनी सांगितले.
मी तुम्हाला पेनड्राईव्ह देतो त्यात तुम्हाला माझ्यावरील सर्व आरोपांची उत्तरे मिळतील, तुम्ही त्याकडे निष्पक्षपणे पहा, तुम्हाला मी निर्दोष असल्याचे लक्षात येईल असा दावा झाकीर नाईक यांनी केला. जगभरात जिथे कुठे दहशतवादी हल्ला होतो त्याचा मी निषेध करतो. नीस हल्ल्याचाही मी निषेध करतो. आत्मघातकी हल्ला हे कृत्य हराम असून हा अर्धम आहे. कुठल्याही माणसाची हत्या करणे हे अनैतिक कृत्य आहे असे झाकीर नाईक यांनी सांगितले.
ढाका दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांनी झाकीर नाईक यांच्या भाषणातून प्रेरणा घेतल्याचे सांगितल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी दोनवेळा त्यांची पत्रकारपरिषद रद्द झाली होती. भारतीय प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ शोधला असे नाईक यांनी सांगितले.
ज्या वर्तमानपत्राने ढाका हल्ल्यासाठी मला जबाबदार धरले होते. त्यांनी नंतर आपली चूक सुधारली असा दावा झाकीर नाईक यांनी केला. काही प्रवचनकार युवकांची दिशाभूल करतात. तुम्ही निरपराधांची हत्या केली तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल असे सांगून ते युवकांची दिशाभूल करतात असे त्यांनी सांगितले
काय म्हटले झाकीर नाईक यांनी पत्रकारपरिषदेत
भारतीय प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ शोधला.
मी शांतीचा दूत आहे, नीस हल्ल्याचा मी निषेध करतो.
माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला, मी शांतीसाठी प्रवचन देतो, हिसेंसाठी चिथावणी देत नाही.
आत्मघातकी हल्ल्याचा मी निषेध करतो, हे कृत्य हराम असून हा अर्धम आहे .
मी तुम्हाला पेनड्राईव्ह देतो त्यात तुम्हाला माझ्यावरील सर्व आरोपांची उत्तरे मिळतील, तुम्ही त्याकडे निष्पक्षपणे पहा, तुम्हाला मी निर्दोष असल्याचे लक्षात येईल.
ज्या वर्तमानपत्राने ढाका हल्ल्यासाठी मला जबाबदार धरले होते, त्यांनी नंतर आपली चूक सुधारली.
कोल्हापूर : पूरात वाहून गेलेल्या वडणगेतील तरुणाचा मृतदेह सापडला.
जगभरात जिथे कुठे दहशतवादी हल्ला होतो त्याचा मी निषेध करतो.